Pimpari News : बँक खात्याचा गैरवापर व सायबर फसवणूक
Pimpari News : पिंपरी : पिंपरी येथील एका अठरा वर्षीय तरुणीच्या बँक खात्याचा व एटीएम कार्डचा गैरवापर करून सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
3 min read

Pimpari News : पिंपरी : पिंपरी येथील एका अठरा वर्षीय तरुणीच्या बँक खात्याचा व एटीएम कार्डचा गैरवापर करून सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ई-सेवा केंद्राचे व शिष्यवृत्तीचे पैसे मिळवण्याच्या बहाण्याने संशयितांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे पासबुक व एटीएम कार्ड घेऊन ते आरोपी सौरभ दत्तात्रय पाटणे आणि ओम अविनाश गाडे (दोघे रा. भोर, पुणे) यांच्याकडे दिले. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pimpari News
ज्येष्ठ नागरिकाची दीड लाखांची फसवणूक; केवायसीच्या नावाखाली लुटले
पिंपरी - तळेगाव चाकण रोडवरील सदगुरू कृपा जनरल स्टोअरमध्ये घडलेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय फिर्यादी मनोहर गणपत पिंगळे यांच्या दुकानात २० ते २५ वयोगटातील एक तरुण आला होता. फोन पे (PhonePe) ची केवायसी पूर्ण करायची आहे असे सांगून त्याने दुकानदाराचा मोबाईल फोन व कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर मोबाईलमध्ये त्यांचा फोटो काढून फिर्यादीच्या परस्पर संमतीशिवाय त्यांच्या नावावर दीड लाख रुपयांचे ऑनलाइन कर्ज (लोन) काढून त्यांची फसवणूक केली. https://maharashtramirror.com/ Pimpari News
या गंभीर प्रकाराची नोंद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे आणि पोलीस उपनिरीक्षक खामगळ करत आहेत. सायबर गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला मोबाईल, छायाचित्र किंवा कागदपत्रे देऊ नयेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.https://maharashtramirror.com/ Pimpari News
भरधाव क्रेनच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी
पिंपरी – भरधाव वाहनाने मागून धडक दिल्याने निलेश गायकवाड (वय-३४) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इंद्रायणीनगर चौक, भोसरी येथे झाला. अपघाताप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी स्वप्नील बाळकृष्ण गायकवाड (रा. खोडद, जुन्नर) यांनी गुन्हा दाखल केला आहे. https://maharashtramirror.com/ Pimpari News
निलेश गायकवाड, हे सिग्नलला थांबले होते. त्याच्या यामाहा मोटारसायकलला (MH12HH4880) मागून येणाऱ्या क्रेनवरील (MH14CM0245) चालकाने जोरदार धडक दिली. या अपघातात निलेश यांच्या उजव्या पायाचे हाड फॅक्चर झाले असून पोलिस उपनिरीक्षक मणेर पुढील तपास करत आहेत. https://maharashtramirror.com/ Pimpari News
वाल्हेकरवाडी येथे विनापरवाना तीन पत्ती जुगार अड्यावर छापा
पिंपरी- पोलीस आयुक्तालय हद्दीतील चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बेकायदेशीर जुगार अड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरातील पवना नदी पात्राजवळील गुरांच्या गोठ्याशेजारील मोकळ्या जागेत चार्जिंगच्या बल्बच्या प्रकाशात हा जुगार सुरू होता. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केलेल्या या कारवाईत आरोपी सोनु अर्जुन सिंग (वय ३०, रा. हडपसर, मूळ झारखंड) आणि भानुदास भरत सुरवसे (वय २४, रा. हिंजवडी, मूळ बिहार) यांच्यासह इतर चार पळून गेलेल्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ pimpari News
पोलिसांनी घटनास्थळावरून ८२,१४० रुपये रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य, मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ढवण करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pimpari News
पिंपरीत २ किलो ९३२ ग्रॅम गांजासह एक जण जेरबंद
पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी येथील साईलिला हाऊसिंग सोसायटीच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत विनापरवाना व अनाधिकाराने विक्रीसाठी बाळगलेला दीड लाख रुपये किमतीचा २.९३२ किलो वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. https://maharashtramirror.com/ Pimpari News
संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष भानुदास राजपूत यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, त्यावरून आरोपी राहुल उर्फ अशोक गौतम जगताप (वय ३९, रा. साईलिला हाऊसिंग सोसायटी, विठ्ठलनगर, पिंपरी, पुणे) याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये (अमली पदार्थ विरोधी कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.


