Pune Crime : कॉलेज प्रवेशाच्या नावाखाली दहा लाखांची फसवणूक
Pune Crime : पिंपरी - दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये मुलाचे कॉलेजमधील प्रवेश निश्चित करून देण्याचे आमिष दाखवून सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
1 min read

Pune Crime : पिंपरी - दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये मुलाचे कॉलेजमधील प्रवेश निश्चित करून देण्याचे आमिष दाखवून सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी अमित धरमचंद जैन (रा. रहाटणी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एच.एम. रियल्टीचे संशयित इसम सिद्धार्थ, विवान, वेदिका आणि तन्मय यांनी तीन लाख रुपये ऑनलाईन व सात लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. मात्र प्रवेश न देता आणि पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक नलावडे तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime
बँक खात्याचा गैरवापर व सायबर फसवणूक
पिंपरी - पिंपरी येथील एका अठरा वर्षीय तरुणीच्या बँक खात्याचा व एटीएम कार्डचा गैरवापर करून सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ई-सेवा केंद्राचे व शिष्यवृत्तीचे पैसे मिळवण्याच्या बहाण्याने संशयितांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे पासबुक व एटीएम कार्ड घेऊन ते आरोपी सौरभ दत्तात्रय पाटणे आणि ओम अविनाश गाडे (दोघे रा. भोर, पुणे) यांच्याकडे दिले. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime


