Skip to content

Pimpari News : पिंपरीत शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांसाठी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न

Pimpari News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ कार्यक्षेत्रातील शाळा आणि कॉलेजेसमधील प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी अंमली पदार्थ विरोधी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे गुरूवारी (दि.२७) आयोजन करण्यात आले होते.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पिंपरीत शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांसाठी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न
पिंपरीत शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांसाठी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न

Pimpari News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ कार्यक्षेत्रातील शाळा आणि कॉलेजेसमधील प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी अंमली पदार्थ विरोधी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे गुरूवारी (दि.२७) आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम संत तुकारामनगर येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये दुपारी १२ ते २ या वेळेत पार पडला. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक विल्मय साळवे, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, परिमंडळ-१ चे पोलीस उप-आयुक्त संदीप आटोळे, सांगवी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त मनीषा कदम आणि पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच दापोडीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर चे शिक्षक मिलिंद संधान, निगडीमधील मॉडर्न कॉलेज चे डॉ. सत्यवान कुंभार आणि आकुर्डीतील सरस्वती विद्यालय च्या शिक्षिका मोहिनी अनेकर यांनीही अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीबाबत मते मांडली.https://maharashtramirror.com/ Pimpari News

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. या कार्यक्रमाला परिमंडळ-१ क्षेत्रातील विविध शाळा आणि कॉलेजेसमधील सुमारे १७० ते १८० प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.https://maharashtramirror.com/ Pimpari News

या उपक्रमासाठी निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षिक महेश बनसोडे, चिंचवडचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दत्तात्रय चासकर, पिंपरीच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक रुपाली बोबडे, संत तुकाराम नगरचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुहास आव्हाड, दापोडीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरख कुंभार आणि सांगवीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र कोळी यांनी सहभाग नोंदवला.

Share