Pimpri Crime : बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व साहित्याची चोरी
Pimpri Crime :पिंपरी, महाराष्ट्र मिरर : मोई येथील एका बंद घराचे कडी-कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व घरगुती वस्तू असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
5 min read

Pimpri Crime : दक्षिण महाळुंगे पोलिसांत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल
Pimpri Crime :पिंपरी, महाराष्ट्र मिरर : मोई येथील एका बंद घराचे कडी-कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व घरगुती वस्तू असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (७ ऑक्टोबर) दुपारी शिवतेजनगर, फलकेवस्ती, मोई येथे उघडकीस आली.https://maharashtramirror.com/ Pimpri Crime
या प्रकरणी संजय भारत कसबे (४३, पाषाण, पुणे) यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pimpri Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे येथे राहतात तर त्यांचे आई-वडील मोई येथे राहतात. आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने घराच्या सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील लोखंडी कपाट व बेडमधील साहित्य विस्कटून शोकेसच्या ड्राव्हरमधील सोन्याचे दागिने, एलसीडी आणि इतर साहित्य असा १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करत आहेत.
क्रेडिट कार्डची माहिती विचारून ९३ हजार रुपयांची फसवणूक
अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : इन्फोसिस कंपनीत कार्यरत असलेल्या एका तरुणीला फोन करून क्रेडिट कार्डची माहिती मिळवत ऑनलाईन ९३ हजार १५९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी (६ ऑक्टोबर) दुपारी इन्फोसिस कंपनी, हिंजवडी फेज २ येथे घडली.
याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात मोबाईल नंबर धारक महिला आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत कामावर असताना त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोनवरील महिला आरोपीने फिर्यादीच्या क्रेडिट कार्डची माहिती विचारून ती मिळवली. त्यानंतर 'चेक डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड' मध्ये ऑनलाईन ट्रान्सझॅक्शन करून फिर्यादीच्या खात्यातून ९३ हजार १५९ रुपये काढून घेत फसवणूक केली.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस सखोल तपास करत आहेत.
बनावट दाखल्यांचा वापर करून पंतप्रधान आवास योजनेचा फ्लॅट हडपला
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला मिळवून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पीएमआरडीएकडून फ्लॅट मिळवत शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना २१ मे २०२१ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत व्याघ्रगड सहकारी गृहनिर्माण संस्था, सेक्टर नं. १२, भोसरी येथे घडली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अशोक भोगल यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद दानिश अब्दुल माजिद शेख (४५, भोसरी, पुणे), त्याची पत्नी आणि एजंट इरफान शेख (खराळवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद दानिशचा जन्म उत्तर प्रदेशात झालेला असताना त्याने खडकी येथील ज्युनिअर कॉलेजचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला आणि वडिलांचा शाळा निर्गम उतारा एजंटमार्फत बनवून घेतला. या बनावट कागदपत्रांच्या आधारे हवेली तहसील कार्यालयातून महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला मिळवला. या दाखल्याचा वापर करून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पीएमआरडीए कडून व्याघ्रगड सोसायटीतील फ्लॅट नंबर ९०४ स्वतःच्या नावावर करून शासनाची फसवणूक केली.
भोसरी एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
किरकोळ वादातून रिक्षाचालकाला मारहाण
दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : किरकोळ वादातून एका रिक्षाचालकाला हाताने मारहाण करून उजव्या हातावर दगड मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी नऊच्या सुमारास गोडांबे कडबाकुटी जवळ, तळेगाव दाभाडे येथे घडली.
याबाबत विनोद नवनाथ कांबळे (३९, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप शेंद्रे आणि त्यांच्या १९ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला किरकोळ वादाच्या कारणावरून हाताने मारहाण केली. तसेच उजव्या हाताच्या बोटावर दगड मारून तीन बोटांना गंभीर दुखापत केली आणि मुका मार दिला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
पत्नीसोबत झालेल्या भांडणातून पतीवर चाकूने वार
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : पत्नीसोबत झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून पतीला चौघांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकू व बांबूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (८ ऑक्टोबर) दुपारी अडीचच्या सुमारास नढेनगर, काळेवाडी येथे घडली.
याप्रकरणी पवन संजय वेदपाठक (२७, काळेवाडी, पुणे) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय शिवाजी अहिरे (२७), रोहित शिवाजी अहिरे (२५), पवन यांची पत्नी (२२) आणि अन्य एक महिला (२४, सर्व रा. काळेवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे त्यांच्या पत्नीसोबत किरकोळ भांडण झाले होते. याचा राग धरून आरोपींनी संगणमत करून फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका आरोपीने फिर्यादीच्या पोटावर चाकूने मारले तर दुसऱ्या आरोपीने डोक्यात बांबू मारून गंभीर जखमी केले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
कारच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी
कारचालकावर गुन्हा दाखल
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : भरधाव वेगात आलेल्या किया कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने ७३ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (५ ऑक्टोबर) दुपारी दोनच्या सुमारास कासारवाडी ओव्हर ब्रिज, भोसरी रोड येथे घडली.
वसंत श्रीपती दसगुडे (७३) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत प्रदीप वसंत दसगुडे (३७, भोसरी, पुणे) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किया कार (एमएच १४ जेई ३७६८) च्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील वसंत दसगुडे हे पुण्यावरून भोसरीकडे आपल्या दुचाकीवरून जात होते. कासारवाडी ओव्हर ब्रिजवर आले असता पाठीमागून आलेल्या कारचालकाने त्यांच्या दुचाकीला उजवीकडून जोरदार धडक दिली. या अपघातात वृद्धाच्या डोक्याला, दोन्ही पायांना, हाताला व खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. दापोडी पोलीस तपास करत आहेत.
ट्रकच्या धडकेत वाहतूक पोलीस गंभीर जखमी
देहूरोड पोलिसांत ट्रकचालकावर गुन्हा दाखल
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : वाहतूक नियमन करत असलेल्या एका पोलीस हवालदाराला भरधाव ट्रकने धडक देऊन त्यांच्या पायावरून चाक घालवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजेच्या सुमारास कृष्णा चौक, किवळे येथे घडली.
पोलीस हवालदार दत्तात्रय शेंडे असे जखमी वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय जगताप यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक लक्ष्मण शिवाजी ताकभाते (४२, कात्रज, पुणे, मूळ रा. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय शेंडे हे देहूरोड वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. ते आणि त्यांचे सहकारी विजय जगताप हे किवळे येथील कृष्णा चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आरोपीने आपला ट्रक (एमएच १२ व्हीएफ १५५३) बेदरकारपणे आणि हयगयीने चालवला. त्याने पोलीस हवालदार दत्तात्रय शेडे यांना मागून धडक देऊन खाली पाडले आणि ट्रकचे मागील चाक त्यांच्या डाव्या पायावरून घालवले. यामुळे शेंडे यांच्या पायाच्या टाचेला आणि घोट्याला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली.
या प्रकरणी देहूरोड पोलीस तपास करत आहेत.


