Pimpri News : पिंपळे सौदागर येथे जुगार अड्ड्यावर छापा
Pimpri News : पिंपरी: पत्र्याच्या चाळीतील खोलीत बेकायदेशीरपणे 'तीन पत्ती' नावाचा जुगार खेळणाऱ्या १० जणांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
1 min read

Pimpri News : साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
Pimpri News : पिंपरी: पत्र्याच्या चाळीतील खोलीत बेकायदेशीरपणे 'तीन पत्ती' नावाचा जुगार खेळणाऱ्या १० जणांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. ही कारवाई शनिवारी (१९ सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील प्रदीप काटे यांच्या पत्र्याच्या खोलीत करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pimpri News
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिवराम भोपे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मण गजानन साळुंके (३०, रा. पिंपळे सौदागर), इलियास मोहमद सईद चौधरी (३४, रा. बोपोडी), अजहर खान मोहमद युसुफ (३६, रा. पिंपळे सौदागर), लखनसिंग दिमानसिंग गुर्जर (४३, रा. रुपीनगर), दिनेश दिना कोठारी (३३, रा. थेरगाव), रामवीर सियाराम कुशवाह (४०, रा. पिंपळे सौदागर), रामदीन महाराजसिंग गुर्जर (४०, रा. रुपीनगर), रोहित राम गुप्ता (२९, रा. मोशी), विकी केदार रजक (२५, रा. सांगवी) आणि नारायण सिंग निवृत्तीलाल कुशवाह (२४, रा. पिंपळे सौदागर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. https://maharashtramirror.com/ Pimpri News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी पैसे लावून जुगार खेळत असताना पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरून रोख रक्कम, साहित्यासह दुचाकी व मोबाईल असा एकूण ६ लाख ६३ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.


