Pune Crime : पिंपळे गुरवमध्ये हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल
Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : पिंपळे गुरव येथील सुश्रुत सर्जिकल हॉस्पिटलमध्ये उपचारात निष्काळजीपणा केल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
1 min read

Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : पिंपळे गुरव येथील सुश्रुत सर्जिकल हॉस्पिटलमध्ये उपचारात निष्काळजीपणा केल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २७ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली. याप्रकरणी वैद्यकीय विभागाकडे अहवाल मागवला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर सांगली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
डॉ. मधू काशीराव पठाणु (वय ३८, रा. रहाटणी) भूलतज्ज्ञ डॉ. अभिषेक विद्याधर लोणीकर (वय ३६, रा. कोथरूड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. निर्मला बबन कातखडे (वय ६१, रा. मोशी, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली.https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती बबन शिवराम कातखडे (वय ६०) यांना नोव्हेंबर २०२३ मध्ये पिंपळे गुरव येथील आरोपींच्या सुश्रुत सर्जिकल हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. बबन यांच्यावर उपचार व ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत निर्मला कातखडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.https://maharashtramirror.com/ Pune crime
पोलिसांनी ससून हॉस्पिटल पुणे येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अहवाल मागितला. ससून हॉस्पिटलच्या तज्ज्ञ समितीच्या अहवालात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.


