Skip to content

PDC Bank News : एआय आधारित शेतीची चळवळ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी

पुणे, महाराष्ट्र मिरर PDC Bank News : बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हान असून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज आहे.

VZ
Vidula Zagade

2 min read

PDC Bank News : एआय आधारित शेतीची चळवळ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन

पुणे, महाराष्ट्र मिरर PDC Bank News : बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हान असून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज आहे. कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेती ही क्रांतिकारक चळवळ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.PDC Bank News

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ, शेतकरी मेळावा आणि आदर्श शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप वळसे पाटील, आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त संजय कोलते, बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे आदी उपस्थित होते.PDC Bank News

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीसाठी ५०० कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा अजितदादांनी दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात केली होती. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे. ही योजना ऊस शेतीमध्ये एआयचा वापर वाढविण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. यामुळे ऊस उत्पादनामध्ये ४० टक्के वाढ, पाण्याची ३० टक्के बचत व रासायनिक खतांचा वापर कमी होऊन शेतीचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. या तंत्रज्ञानाचा बारामतीमध्ये यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.

यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महिला शेतकऱ्यांना अधिकृत महिला शेतकरी म्हणून मान्यता देण्याचा ऐतिहासिक कायदा राज्य सरकारने केला आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांची प्रतीकात्मक यादी प्रसिद्ध करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीला मोठी गती मिळाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६१ हजार ९०० पात्र शेतकऱ्यांना ५२३ कोटी २२ लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. ही पहिली यादी २ लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची आहे.PDC Bank News

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची नेहमीच शासनाची भूमिका आहे. याच हेतूने ‘पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेची घोषणा केली आहे. ५६ लाख शेतकऱ्यांना ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत या योजनेत मिळणार आहे. या योजनेमुळे २ हजार कोटी रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

यावेळी मंत्री बाबासाहेब पाटील, दिलीप वळसे- पाटील यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी या योजनेची माहिती दिली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच, योजनेंतर्गत कर्ज मर्यादा, परतफेड व व्याजदर आदी माहिती दिली.PDC Bank News

यावेळी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी व महाराष्ट्र शासनाचे कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात, दिलीप मोहिते, अशोक पवार, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.PDC Bank News

Share