PCMC NEWS : "दारू पिऊन मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत का करावी?"
फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचा प्रस्ताव फेटाळला
1 min read

फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचा प्रस्ताव फेटाळला
पिंपरी PCMC NEWS: फुगेवाडी येथे विषारी दारू प्राशनामुळे १७ जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा महापौर रवी लांडगे यांचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आला. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत नगरसेवकांच्या एका महिन्याच्या मानधनातून देण्यात यावी, अशी सूचना महापौरांनी केली होती.PCMC NEWS

मात्र, अनेक नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवत, "दारू पिऊन मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत का करावी? चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे योग्य नाही. चांगल्या कामासाठी एका महिन्याचे नव्हे तर वर्षभराचे मानधन देण्यास आम्ही तयार आहोत," अशी भूमिका घेत प्रस्ताव धुडकावून लावला.
मिळकतकराच्या वर्गवारीत बदल करण्याचा विषय पुन्हा रखडला
दरम्यान, शहरातील मिळकतकराच्या वर्गवारीत बदल करण्याचा महत्त्वाचा विषयही पुन्हा एकदा रखडला. 'अ', 'ब' आणि 'क' अशा तीन वर्गवारीऐवजी केवळ 'अ' आणि 'ब' अशा दोनच वर्गवारी ठेवण्याच्या प्रस्तावावर सत्ताधारी भाजपमध्ये एकमत न झाल्याने हा विषय सलग तिसऱ्यांदा तहकूब करण्यात आला. अखेरीस तो दप्तरी दाखल करण्यात आला.PCMC NEWS
स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्ताव
याचबरोबर स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्तावही सत्ताधारी भाजपने दप्तरी दाखल केल्याने संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. या प्रक्रियेनुसार भाजपला सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. नगर सचिव मुकेश कोळप यांनी सांगितले की, आयुक्त आणि गटनेत्यांची बैठक घेऊन नव्याने अर्ज मागवले जातील, त्यांची छाननी होईल आणि धर्मादाय आयुक्तांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.PCMC NEWS
नगर सचिव पदावरून भाजपत अंतर्गत वाद
दरम्यान, नगर सचिव पदावरून भाजपमधील अंतर्गत वादही पुन्हा समोर आला. मुकेश कोळप नगर सचिव असतानाच मानधनावरील नगर सचिवपदी उल्हास जगताप यांची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांना स्थायी समितीप्रमाणेच सर्वसाधारण सभेतही बसू देण्यात आले नाही. त्यामुळे सर्वसाधारण सभेत नगर सचिव म्हणून मुकेश कोळप यांनीच कामकाज पाहिले. उल्हास जगताप रजेवर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
PCMC NEWS


