Skip to content

PCMC NEWS : तळेगाव एमआयडीसीत गॅसगळतीत दोघांचा मृत्यू

शाफलर इंडिया कंपनीतील घटना ; तिघांची प्रकृती गंभीर

PG
Prashik Ghaste

1 min read

PCMC NEWS : तळेगाव एमआयडीसीत गॅसगळतीत दोघांचा मृत्यू

शाफलर इंडिया कंपनीतील घटना ; तिघांची प्रकृती गंभीर

पिंपरी-चिंचवड PCMC NEWS: शाफलर इंडिया कंपनीत मंगळवारी (९ जून) दुपारी झालेल्या कार्बन डायऑक्साइड गॅसगळतीच्या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरात घडली.PCMC NEWS


गौरीशंकर शर्मा (वय ३८, रा. आंबी, मावळ), वैभव भाऊसाहेब थोरात (वय २४, रा. चिखली) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. प्रमोद जैसवार, श्रीकृष्ण साहू आणि सुशोभन पाखीरा अशा जखमी झालेल्यांची नावे आहेत.PCMC NEWS

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत वरिल दोघांचा गुदमरल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली असून कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

PCMC NEWS

Share