Skip to content

PCMC NEWS : बावधन येथे सुरक्षा रक्षकाला भरधाव दुचाकीची धडक

भरधाव वेगातील वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी केले

PG
Prashik Ghaste

1 min read

PCMC NEWS : बावधन येथे सुरक्षा रक्षकाला भरधाव दुचाकीची धडक

भरधाव वेगातील वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी केले

पिंपरी, PCMC NEWS: मुंबई-बेंगलोर हायवेवर थांबलेल्या एका सुरक्षा रक्षकाला भरधाव वेगातील दुचाकीने जोरात धडक देऊन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (२९ जून) सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-बेंगलोर हायवे, सातारा लेनवर, बावधन येथे घडली.PCMC NEWS

याप्रकरणी मोहम्मद मसुदमिया अली (५९, रा. संगमवाडी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एम.एच. १४ एम.एल. ८८५०) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.PCMC NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बावधन येथील त्यांच्या मावशीच्या मुलाच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. ते पाषाण तलाव सर्व्हिस रोडवरून मुंबई-बेंगलोर हायवे क्रॉस करून सातारा लेनवरील डोरा फर्निचर दुकानाच्या समोर थांबले होते. त्याच वेळी वाकड बाजूकडून येणाऱ्या दुचाकी चालकाने आपले वाहन भरधाव वेगात, हयगयीने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवून फिर्यादीला जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

PCMC NEWS

Share