PCMC NEWS : महापालिका शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आदर्श केंद्र बनाव्यात, हीच आमची भूमिका – महापौर रवी लांडगे…
ढोल-ताशांच्या गजरात, उत्साही वातावरणात 'शाळा प्रवेशोत्सव' उपक्रम साजरा….
2 min read

ढोल-ताशांच्या गजरात, उत्साही वातावरणात 'शाळा प्रवेशोत्सव' उपक्रम साजरा….
पिंपरी, महाराष्ट्र मिरर, PCMC NEWS: "महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, जिज्ञासू वृत्ती जोपासावी आणि अभ्यासासोबतच खेळ, कला व संस्कार यांनाही तितकेच महत्त्व द्यावे. पालक, शिक्षक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडणार असून महापालिका शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आदर्श केंद्र तयार होतील, अशीआमची भूमिका आहे,'' असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले.PCMC NEWS

“भारत माता की जय’’ असा जयघोष करत ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर, उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळेची घंटा आज वाजली. नवी उमेद आणि आशा घेऊन महापालिका शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत त्यांच्या पालकांसह मोठ्या हर्षोल्हासात भोसरी येथील इंद्रायणीनगर पी. सी. एम. सी. पब्लिक स्कूल येथे महापौर रवि लांडगे यांनी, तर पिंपळेगुरव येथील पी. सी. एम. सी. पब्लिक स्कूल क्र. ५४ येथे आमदार शंकर जगताप आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सपत्निक उपस्थित राहून केले.PCMC NEWS
विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, नगरसदस्य शशिकांत कदम, ज्ञानेश्वर जगताप, शंकुतला धराडे, शाम जगताप, नम्रता लोंढे, माजी नगरसदस्य सागर अंगोळकर, पल्लवी जगताप, विलास मडिगेरी, उप आयुक्त ममता शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्याध्यापिका गीतांजली पोळ, पर्यवेक्षक ज्योती तापकीर यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. शंकर जगताप म्हणाले, "नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असतो. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, नवीन काहीतरी शिकण्याची जिज्ञासा आणि भविष्यात मोठे होण्याची स्वप्ने हीच आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यातील पायाभरणी आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यामध्ये शिक्षण संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून ज्ञानमंदिरात शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा त्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. PCMC NEWS आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, "शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीच्या तुलनेत आजची शिक्षण व्यवस्था अधिक आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि विद्यार्थी केंद्रित झाली आहे. विद्यार्थ्यांना आता दर्जेदार शैक्षणिक सुविधा, डिजिटल साधने, प्रयोगशाळा तसेच विविध विषयांवरील समृद्ध पुस्तके उपलब्ध होत आहेत. या सर्व सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा.''PCMC NEWS
यावेळी आमदार शंकर जगताप आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याशिवाय त्यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला तसेच शाळेमध्ये आवश्यक असलेल्या सोयीसुविधा किंवा सुधारणा याबाबत सविस्तर चर्चा केली.
अति. आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे यांनीदेखील केले विद्यार्थ्यांचे स्वागत
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पी. सी. एम. सी. पब्लिक स्कूल, श्रीमती लीलाबाई क्रांतीलाल खिंवसरा मोहननगर मुले शाळा,थेरगाव शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच खाऊ वाटप करण्यात आला.PCMC NEWS
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, नगरसदस्या अरुणा लंगोटे, वैशाली काळभोर, उप आयुक्त संदीप खोत, तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.


