Skip to content

Turki News : प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली बचावकार्य सुरू

Turki News : उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली बचावकार्य सुरू
प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली बचावकार्य सुरू

Turki News : उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. तब्बल २७० प्रवाशांना घेऊन जाणारी कॅटामरान प्रकारची प्रवासी फेरी बोट समुद्रात अचानक उलटली. किनाऱ्यापासून काही अंतरावर असताना बोटीमध्ये पाणी शिरू लागले आणि त्यानंतर बोट उलटल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि बचाव पथके दाखल झाली असून, आतापर्यंत १०० हून अधिक प्रवाशांची सुटका करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.https://maharashtramirror.com/ Turki News
१०० हून अधिक प्रवाशांची सुटका
उत्तर सायप्रसचे परिवहन मंत्री एर्हान अरिकली यांनी बोट उलटल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत १०० हून अधिक प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून, त्यांना किरेनिया येथे आणण्यात आले आहे.
उत्तर सायप्रसच्या आरोग्य मंत्रालयानेही आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली असून, आवश्यक वैद्यकीय मदत देण्यासाठी तयारी करण्यात आल्याचे सांगितले आहे. https://maharashtramirror.com/ Turki News
जीवितहानीबाबत अद्याप माहिती नाही
या दुर्घटनेनंतर किरेनिया आणि ताशुकचू या मार्गावरील फेरी वाहतूक काही काळ चर्चेत आली आहे. या व्यस्त मार्गावर अनेक कंपन्या फेरी सेवा चालवतात. मात्र, दुर्घटनाग्रस्त बोट नेमकी कोणत्या कंपनीच्या मालकीची आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. https://maharashtramirror.com/ Turki News
दरम्यान, दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, समुद्रात उलटलेल्या बोटीचे आणि सुरू असलेल्या बचावकार्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. बचाव पथकांकडून अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.

Share