Pune News : मतभिन्नता चालेल, मतभेद नको; पत्रकारितेत विचारांशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे : नितीन गडकरी
पत्रकारिता, राजकीय-सामाजिक मूल्ये आणि पुणे मेट्रोच्या निर्णयप्रक्रियेवर गडकरींचे भाष्य
2 min read

पत्रकारिता, राजकीय-सामाजिक मूल्ये ; पुणे मेट्रोच्या निर्णयप्रक्रियेवर गडकरींचे भाष्य
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पत्रकारितेत केवळ बोलणे किंवा सत्य मांडणे एवढेच महत्त्वाचे नसून आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात विचारांप्रती असलेली प्रामाणिकता कमी होताना दिसते. मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे; मात्र त्याचे रूपांतर मतभेदात होता कामा नये. ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी यांनी आपले विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम आयुष्यभर केले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. Pune News

एस. के. कुलकर्णी यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘९० वर्षे पूर्ण करणाऱ्यांची समाजात संख्या कमी नसेल; मात्र एखादी व्यक्ती ही ९० वर्षे कशी जगली, तिने समाजासाठी काय केले, हे अधिक महत्त्वाचे आहे. कुलकर्णी यांनी आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून ते समाजापर्यंत पोहोचविले. पत्रकारितेत वृत्तनिष्ठ आणि व्यावसायिक असे वेगवेगळे प्रवाह दिसतात. मात्र समाजाचा आणि देशाचा विचार करणारा माणूस आपल्या भूमिका सातत्याने मांडत असतो. Pune News https://maharashtramirror.com/
राजकारण आणि समाजकारणातील मूल्यांबाबत चिंता व्यक्त करताना गडकरी म्हणाले की, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मूल्ये कमी होत चालली आहेत. यश-अपयशापेक्षा मूल्यांशी बांधिलकी महत्त्वाची आहे. ‘‘मी दिल्लीत असतानाही मराठी वर्तमानपत्रे वाचतो. प्रामुख्याने ‘ॲग्रोवन’ वाचतो. त्यातून अनेक प्रकारची माहिती मिळते. कितीही ‘फास्ट फूड’चा जमाना आला, तरी शेवटी चांगल्या आणि सकस अन्नाचेच कौतुक होते. पत्रकारितेतही चांगले काम करणारी माणसे कायम महत्त्वाची राहतात,’’ असे त्यांनी नमूद केले. Pune News https://maharashtramirror.com/
राजकीय नेत्यांना अनेक सत्कार आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते, असे सांगत गडकरी यांनी पुण्याच्या स्वभावावरही मिश्कील भाष्य केले. ‘‘कोणी काहीही म्हणो, त्याची चिंता न करता आपल्याला योग्य वाटते ते करायचे आणि बोलायचे, यासाठी पुणे प्रसिद्ध आहे. पूर्वी नागपूरची संत्री पुण्यात विकली जाणार नाहीत, असे वाटायचे; पण आता नागपूरची संत्री पुण्यातही गोड लागायला लागली आहेत,’’ असे ते म्हणाले. यश मिळाल्यानंतर अनेक जण त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात; मात्र पराजयाची जबाबदारी घेण्यासाठी कोणी पुढे येत नाही, असेही त्यांनी सांगितले. Pune News
पुणे मेट्रोच्या निर्णयप्रक्रियेची आठवण सांगताना गडकरी म्हणाले, ‘‘नागपूरमध्ये मेट्रो सुरू करताना माझ्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली होती. पुण्यात मेट्रो आणि विमानतळाचे प्रश्नही दीर्घकाळ प्रलंबित होते. विमानतळासाठी जागेचा प्रश्न होता. पुणे मेट्रोबाबत बैठक झाली तेव्हा शरद पवार, अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मेट्रो जमिनीखालून करायची की उन्नत मार्गाने, यावर चर्चा सुरू होती. निर्णय होत नव्हता. शेवटी मला योग्य वाटणारी भूमिका घेऊन काम पुढे नेले.’’ समाजाच्या हिताचे काम असेल तर निर्णय घेण्याचे धाडस दाखवावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले. maharashtra mirror
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा संदर्भ देत गडकरी म्हणाले, ‘‘मतभिन्नता असली तरी चालेल; मात्र मतभेद असता कामा नयेत.’’ लोकशाहीत प्रत्येकाला वेगवेगळे विचार मांडण्याचा अधिकार आहे. आपण योग्य समजतो ते काम करायचे आणि जे योग्य वाटत नाही ते करायचे नाही, ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘मी तीन वेळा निवडून आलो. गरीब माणसासाठी काम केले आणि पुढेही करत राहणार आहे,’’ असे गडकरी म्हणाले. Pune News
पत्रकारितेच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांवरही त्यांनी भाष्य केले. माहितीच्या अधिकाराचा वापर करून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या एका व्यक्तीचा अनुभव सांगत त्यांनी पत्रकारितेतील मूल्ये आणि जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. पत्रकारिता ही समाजहिताची भूमिका घेणारी असावी आणि विचारभिन्नता असली तरी वैचारिक प्रामाणिकपणा कायम राहिला पाहिजे, असे गडकरी यांनी सांगितले. Pune News


