Mumbai news: आदित्य ठाकरेंना काल जास्त नशेत पाहिलं; ड्रग्स टेस्ट केली असती तर पेंग्विनसारख्या उड्या मारण्याचं कारण समजलं असतं!
Mumbai news: मुंबई :- मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, भाजप नेते तथा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर अत्यंत
2 min read

Mumbai news: भाजप नेते नितेश राणे यांचा ठाकरे बंधूंवर अत्यंत घणाघाती आणि खालच्या पातळीवरील हल्लाबोल; बांगलादेशी आणि रोहिंग्यांवरून साधला जोरदार निशाणा
Mumbai news: मुंबई :- मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, भाजप नेते तथा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी आणि घणाघाती टीका केली आहे. काल पोलिसांच्या व्हॅनवर उभे राहून ओढत-ओरडत असलेल्या आदित्य ठाकरेंना पाहिल्याचे सांगत नितेश राणे म्हणाले की, "दिशा सालियन प्रकरणातील नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडील चॅट्सनुसार आदित्य ठाकरे हे ड्रग्सचे सेवन करतात, आणि कालच्या आंदोलनात त्याचाच इफेक्ट स्पष्ट दिसत होता. पोलिसांनी त्यांची ड्रग्स टेस्ट केली असती, तर काल हा पेंग्विन उगाच का उड्या मारत होता हे महाराष्ट्राला समजले असते." तसेच आदित्यच्या संगतीचा वाईट असर अमित ठाकरेंवर होत असल्याचा सल्ला देत, "आदित्यच्या मांडीला मांडी लावून बसू नका," असेही ते अमित ठाकरेंना उद्देशून म्हणाले.https://maharashtramirror.com/ Mumbai news
बाळासाहेबांचे विचार रसातळाला नेले, आताचे दोन्ही ठाकरे वाकरे झालेत
बाळासाहेब ठाकरे यांनी कायम रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेत त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही अशी दहशत निर्माण केली होती, अशी आठवण करून देत नितेश राणे म्हणाले की, "तेव्हाचे बाळासाहेब ठाकरे आणि आताचे हे 'वाकरे' यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आताचे हे वाकरे फक्त मतदार यादीत बांगलादेशी आणि रोहिंग्यांची नावे राहावीत आणि त्यांनी व्होट जिहाद करून आपले खासदार निवडून आणावेत, यासाठी धडपडत आहेत. मोहल्ल्यातून त्यांना 50 ते 70 टक्के मतदान मिळाल्यामुळे त्यांना या घुसखोरांचे प्रचंड प्रेम जडले आहे." बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आजच्या नेत्यांनी पूर्णपणे मातीत मिळवले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
'हिंमत असेल तर वरळीचा राजीनामा देऊन निवडणुका लढवा'
आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राणे यांनी थेट राजीनाम्याचे आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, "एसआयआर (SIR) प्रकरणावर तुमचा इतकाच आक्षेप होता, तर लोकसभा निवडणुकीनंतर तुमचे थोबाड का बंद होते? हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंनी वरळीतून आणि दादरचा आमदार महेश सावंतने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. विधानसभा आणि बीएमसी निवडणुकीत जनतेने यांना पूर्णपणे नाकारले आहे, त्यामुळे आता एसआयआरवर बोट दाखवण्यापूर्वी आपल्या उरलेल्या आमदारांचे राजीनामा फेका," असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेमुळे महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्ष आणखी टोकाला पोहोचला आहे.


