Skip to content

Nepal News : नेपाळमध्ये पुन्हा पुराचा धोका

Nepal News : काठमांडू - नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातून परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा मोठ्या पुराचा धोका निर्माण झाला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

नेपाळमध्ये पुन्हा पुराचा धोका तिबेटमध्ये धरण फुटल्याने अलर्ट
नेपाळमध्ये पुन्हा पुराचा धोका तिबेटमध्ये धरण फुटल्याने अलर्ट

Nepal News : तिबेटमध्ये धरण फुटल्याने अलर्ट


Nepal News : काठमांडू - नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातून परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा मोठ्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. तिबेटमध्ये धरण फुटल्याने नेपाळमधील काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली असून, अद्याप बाराशे हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नेपाळ सरकारने सुरक्षा कर्मचारी, बचाव पथके तसेच मदतकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. https://maharashtramirror.com/ Nepal News
तिबेटमध्ये धरण फुटल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नेपाळच्या सीमावर्ती भागात विशेष खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. https://maharashtramirror.com/ Nepal News
दरम्यान, पुरामुळे नेपाळमध्ये अनेक घरे आणि रस्ते वाहून गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतासह विविध देशांकडून नेपाळला मदत केली जात आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकांबाबतही भारत सरकार संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहे. पुरानंतरची परिस्थिती गंभीर असतानाच तिबेटमधील धरण फुटल्याने निर्माण झालेल्या नव्या धोक्यामुळे नेपाळच्या प्रशासनासमोर आव्हान वाढले आहे.

Share