Nepal News: नेपाळमध्ये पुराबाबत डेटा शेअर करण्याबाबत मतभेद
Nepal News काठमांडू : नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा वाढत आहे.
1 min read

Nepal News : संपूर्ण माहिती न मिळाल्याची तक्रार

Nepal News काठमांडू : नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. तीन हजांराहून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. चीन आणि नेपाळमध्ये पुराबाबत डेटा शेअर करण्याबाबत मतभेद आहेत. मे महिन्यात नेपाळची राजधानी काठमांडू याठिकाणी नैसर्गिक आपत्तींच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी नेपाळ आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. तीन महिन्यांनंतर, 26 ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेवरील हिमनदी तुटल्याने मोठा पूर आला.https://maharashtramirror.com/ Nepal News
या दुर्घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये आपत्तीशी संबंधित माहितीची देवाणघेवाण करण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेपाळ संपूर्ण माहिती न मिळाल्याची तक्रार करत असताना चीनने सर्व गोष्टी वेळेवर शेअर केल्याचं म्हटलं आहे.https://maharashtramirror.com/ Nepal News
नेपाळची तक्रार
नेपाळचे म्हणणे आहे की त्यांनी चीनकडे हिमनद्यांची हालचाल, नद्यांच्या पाण्याची पातळी आणि अतिवृष्टीशी संबंधित आवश्यक डेटा मागितला होता, जेणेकरून ते वेळेत तयारी करू शकेल. पण त्याला चीनकडून अपेक्षित तेवढी माहिती मिळाली नाही.https://maharashtramirror.com/ Nepal News
चीनने नेपाळचा दावा फेटाळून लावला
चीनने नेपाळचे आरोप फेटाळून लावले आणि आवश्यक माहिती वेळेवर शेअर केल्याचे सांगितले. चिनी दूतावासाच्या म्हणण्यानुसार, हिमालयाचा हा सीमावर्ती भाग अत्यंत दुर्गम आहे, त्यामुळे तेथे देखरेख ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. चीनचे म्हणणे आहे की अपघाताच्या बारा दिवस आधी, त्यांच्या हवामान केंद्राने नेपाळला अतिवृष्टी आणि भूस्खलनासारख्या आपत्तींचा इशारा देणारा ईमेल पाठवला होता.


