Skip to content

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला

बीड : परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते संजय जाधव यांच्यावर रविवारी रात्री उशिरा ५ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले.

PG
Prashik Ghaste

1 min read

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला

बीड : परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते संजय जाधव यांच्यावर रविवारी रात्री उशिरा ५ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


संजय जाधव हे रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गोवर्धन हिवरा ते सिरसाळा रस्त्यावर असलेल्या आपल्या शेताकडून घराकडे जात होते. ते गोवर्धन शिवारात आले असता, दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची वाट अडवली. काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. जाधव यांच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. जाधव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच परळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच संजय जाधव यांनी गावातील एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या वादातूनच हा सूड घेण्याचा प्रकार घडला असावा का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.

NCP leader attacked in Beed

Share