Skip to content

Pune News : नवी सांगवीत ४१ वर्षीय महिलेची २१ लाखांची फसवणूक

Pune News पिंपरी: शेअर मार्केट व फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये दरमहा चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २१ लाख ३७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

नवी सांगवीत ४१ वर्षीय महिलेची २१ लाखांची फसवणूक
नवी सांगवीत ४१ वर्षीय महिलेची २१ लाखांची फसवणूक

Pune News : शेअर मार्केट, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष; तीन जणांवर गुन्हा

Pune News पिंपरी: शेअर मार्केट व फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये दरमहा चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २१ लाख ३७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १ फेब्रुवारी २०२४ पासून नवी सांगवी येथील साईराज रेसिडेन्सी येथे घडली असून ३ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

या प्रकरणात ४१ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाजीराव विलास पाटील (४८), एका ४४ वर्षीय महिला आणि सर्वेश बाजीराव पाटील (१८, सर्व रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला शेअर मार्केट व फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास दरमहा १० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. सुरुवातीला वेळोवेळी थोडा नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीला कोणताही नफा न देता ट्रेडिंगसाठी ऑनलाईन व रोख स्वरूपात गुंतवलेले २१ लाख ३७ हजार ४४ रुपये परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share