Navi Mumbai News : आगरी-कोळी पुतळ्याचा अवमान करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या! वाशी पोलिसांची मानखुर्दमध्ये धडक कारवाई; इन्स्टाग्राम व्हिडीओ ठरला पुरावा
Navi Mumbai Latest News : पुतळ्याची विटंबना करून व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; तांत्रिक तपासाच्या आधारे विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले
1 min read

Navi Mumbai Latest News : पुतळ्याची विटंबना करून व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; तांत्रिक तपासाच्या आधारे विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले
नवी मुंबई/वाशी :- वाशी येथील मिनी सीशोर परिसरात असलेल्या आगरी-कोळी बांधव आणि महिलेच्या पुतळ्याचा अवमान केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत आरोपींना ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर (इन्स्टाग्राम) पुतळ्याच्या विटंबनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने समाजात संतापाची लाट उसळली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या काही तासांत मानखुर्द परिसरातून दोषींचा शोध लावला आहे. Navi Mumbai Lateste News
नेमकी घटना काय?
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी, सेक्टर-10 येथील मिनी सीशोर, जुहूगाव चौपाटी येथे आगरी-कोळी संस्कृतीचे प्रतीक म्हणून एक पुतळा बसविण्यात आला आहे. काही अनोळखी इसमांनी या पुतळ्याची विटंबना करण्याच्या हेतूने एक आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केला आणि तो 'ILAAS_011' या इन्स्टाग्राम आयडीवरून प्रसारित केला. ही बाब निदर्शनास येताच स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांकडे धाव घेतली.
वाशी पोलिसांची तातडीची कारवाई
पोलीस उप-आयुक्त पंकज डहाणे आणि सहायक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 298,299,302,3(5) आणि आयटी ॲक्टच्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान विले, योगेश भोसले आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. गोपनिय माहितीच्या आधारे या इन्स्टा आयडीचा वापर करणारे इसम मुंबईतील मानखुर्द, लल्लुभाई कंपाऊंड परिसरात असल्याची माहिती मिळाली.
मानखुर्दमध्ये शोध आणि ताब्यात घेण्याची कारवाई
पोलीस उप-निरीक्षक बाबासाहेब सांगळे आणि त्यांच्या पथकाने मानखुर्दमध्ये शोध घेऊन संबंधित इसमांना 12 मार्च 2026 रोजी ताब्यात घेतले. त्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्रांची तपासणी केली असता, ते विधी संघर्षग्रस्त बालक (Minor) असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेला मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे.


