Skip to content

Sambhajinager : पावसासाठी मुस्लिम बांधवांची ‘नमाज-ए-इस्तिस्का’

Sambhajinager :संभाजीनगर : पावसाने दडी मारल्याने छत्रपती संभाजीनगर परिसरात पावसासाठी मुस्लिम बांधवांकडून विशेष ‘नमाज-ए-इस्तिस्का’ अदा करण्यात आली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पावसासाठी मुस्लिम बांधवांची ‘नमाज-ए-इस्तिस्का’
पावसासाठी मुस्लिम बांधवांची ‘नमाज-ए-इस्तिस्का’

Sambhajinager :संभाजीनगर : पावसाने दडी मारल्याने छत्रपती संभाजीनगर परिसरात पावसासाठी मुस्लिम बांधवांकडून विशेष ‘नमाज-ए-इस्तिस्का’ अदा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र येत अल्लाहकडे पावसासाठी प्रार्थना केली.https://maharashtramirror.com/ sambhajinager
पावसाअभावी शहरासह परिसरातील नागरिक आणि शेतकरी चिंतेत आहेत. पाण्याचे स्रोत आटत चालल्याने पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी विशेष नमाज अदा करून चांगल्या पावसासाठी दुआ मागितली.https://maharashtramirror.com/ sambhajinager
यावेळी ‘या अल्लाह, करम फरमाना आणि रहमतचा पाऊस बरसव’ अशी प्रार्थना करण्यात आली. सर्वांसाठी सुख-समृद्धी आणि पाण्याची समस्या दूर व्हावी, अशीही दुआ करण्यात आली. पावसासाठी विशेष नमाज अदा करण्याची परंपरा मुस्लिम समाजात आहे. पावसाची कमतरता भासत असताना ‘नमाज-ए-इस्तिस्का’द्वारे पावसासाठी प्रार्थना केली जाते.

Share