Mumbai Crime : नालासोपाऱ्यात लव्ह जिहादचा खळबळजनक प्रकार; 70 ते 80 हिंदू तरुणींना फसवणाऱ्या आरिफ शेखला बेड्या!
Mumbai Crime : नालासोपारा : - नालासोपारा परिसरातून एक अतिशय संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला असून, एका मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
2 min read

Mumbai Crime : लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार; भूतबादेची भीती दाखवून घरी ठेवत आरोपीसह कुटुंबीयांवर गंभीर गुन्हे दाखल
Mumbai Crime : नालासोपारा :- नालासोपारा परिसरातून एक अतिशय संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला असून, एका मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या नराधमाने केवळ एकाच नव्हे तर तब्बल 70 ते 80 हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत गंभीर गैरप्रकार केल्याचा खळबळजनक आरोप पीडित तरुणीने केला आहे. या घृणास्पद प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप उसळला असून, नालासोपारा पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai Crime
इन्स्टाग्राम पार्टीत ओळख अन् भूतबादेची भीती दाखवून अडकवले जाळ्यात
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 23 वर्षीय तरुणीची तिच्या मैत्रिणीमार्फत इन्स्टाग्राम फॉलोअर्स सेलिब्रेशन पार्टीदरम्यान आरोपीशी ओळख झाली होती. आरिफ आयुब शेख (22 वय) असे या मुख्य आरोपीचे नाव असून त्याने तरुणीशी जवळीक वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर आरोपीने पीडितेची त्याची आई रुक्साना खान हिच्याशी भेट करून दिली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीच्या आईने पीडितेला तिच्या घरात 'भूतबाधा' असल्याचे सांगून मनात अंधश्रद्धेची भीती निर्माण केली आणि तिला स्वतःच्या घरी राहण्यास भाग पाडले. पीडिता तिथे राहण्यास गेल्यानंतर, आरिफने तिच्याशी लवकरच लग्न करण्याचे झूठे आश्वासन देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग; तिघांवर गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आरिफ आयुब शेख याने केवळ तिच्यासोबतच नव्हे तर अशा जवळपास 70 ते 80 हिंदू तरुणींना वेगवेगळ्या आमिषांच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केले आहेत. एवढेच नव्हे तर, या तरुणींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून त्यांचा गैरवापर व ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 64,127 (2), 115(2), 352(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरिफ खान, त्याची आई रुक्साना खान आणि साहिल खान या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून मुख्य आरोपी आरिफ शेख याला अटक केली आहे.
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; कठोर शिक्षेची मागणी
पीडित तरुणी हिंदू आणि आरोपी मुस्लिम समुदायाशी संबंधित असल्याने या प्रकरणाने मोठे राजकीय व सामाजिक वळण घेतले आहे. या लव्ह जिहादसारख्या गंभीर प्रकरणावरून विविध हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्रमक पवित्रा घेतला असून प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी नराधमांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी विश्व हिंदू महासंघाचे प्रभारी प्रदीप मिश्रा यांनी केली आहे.


