Skip to content

महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर

बिबवेवाडी, येरवडा, कोंढवा, हडपसर, लोहगाव, उंड्री आणि आंबेगाव परिसरातील काही शाळांचा समावेश आहे

PG
Prashik Ghaste

1 min read

महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर

बिबवेवाडी, येरवडा, कोंढवा, हडपसर, लोहगाव, उंड्री आणि आंबेगाव परिसरातील काही शाळांचा समावेश आहे

निलेश राऊत
पुणे: पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शहरातील १३ अनधिकृत शाळा असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती दिली आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीत एकूण १३ शाळांचा समावेश आहे.

यामध्ये बिबवेवाडी, येरवडा, कोंढवा, हडपसर, लोहगाव, उंड्री आणि आंबेगाव परिसरातील काही शाळांचा समावेश आहे. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल (बिबवेवाडी), महात्मा गांधी प्रशाला (येरवडा), टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अॅण्ड मक्तब (कोंढवा खुर्द), सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल (कोंढवा बुद्रुक) आणि इमॅन्युअल पब्लिक स्कूल (हडपसर), आकांक्षा अकॅडमी स्कूल (लोहगाव), एलोरा मेडिकल अॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन आर्यन पब्लिक स्कूल (मानाजी नगर), लेगसीहाय स्कूल आणि शिबलीनोमानी इंग्लिश मीडियम स्कूल (कोंढवा बुद्रुक), ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल (उंड्री), इकरा इस्लामिक स्कूल (कोंढवा), ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल (आंबेगाव) आणि आर्यन वर्ल्ड स्कूल (उंड्री) या शाळांचा समावेश आहे.

महापालिकेच्या प्रशासनाने या पार्श्वभूमीवर, पालकांनी आपल्या पाल्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात अशा शाळांमध्ये प्रवेश देऊ नये, असे आवाहन केले आहे.

Share