Mumbai News : दहीहंडीचा थरार! मुंबई-ठाण्यात गोविंदांचा जल्लोष; ९ आणि १० थरांवर अपघात
Mumbai News : मुंबई : राज्यभरात आज दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे.
1 min read

Mumbai News : मुंबई : राज्यभरात आज दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. विविध आयोजक आणि मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून, नामांकित दहीहंडी उत्सवांमध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीमुळे उत्सवाची रंगत आणखी वाढली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
ठाण्यात १० थरांचा प्रयत्न; पथक कोसळले : आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात ‘आर्यन्स गोविंदा पथका’ने तब्बल १० थर रचत जागतिक विक्रमाचा प्रयत्न केला. १० थर यशस्वीरीत्या रचण्यात आले; मात्र दहाव्या थरावरील गोविंदा पूर्णपणे उभा राहण्यापूर्वीच मानवी मनोरा कोसळला. या घटनेमुळे काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
घाटकोपरमध्ये नवव्या थरावर दुर्घटना : मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या वतीने घाटकोपरमध्ये आयोजित दहीहंडी उत्सवात अंधेरी पूर्व येथील ‘अखिल मालपा डोंगरी’ गोविंदा पथकाने ९ थर उभारले. मात्र, नववा थर उतरवित असताना वरच्या थरावरील गोविंद्याचा तोल गेल्याने तो खाली कोसळला. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.https://maharashtramirror.com/ Mumbai News
मागाठाण्यात कलाकारांची मांदियाळी : मागाठाणे गोविंदा महोत्सवाने यंदा २३ वर्षांची परंपरा पूर्ण केली आहे. मुंबईतील मानाच्या आणि मोठ्या दहीहंड्यांपैकी एक असलेल्या या उत्सवात यंदाही सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही या उत्सवाला उपस्थित राहणार आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai News
ठाण्यात २५ लाखांची दहीहंडी : मनसे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने ठाण्यात २५ लाख रुपयांच्या भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात गोविंदा पथकांकडून उभारण्यात येणाऱ्या थरांचा थरार पाहण्यासाठी ठाणेकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, ठाण्यातील ‘शिवतेज महिला गोविंदा पथका’ने सात थर रचत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


