Skip to content

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये तीन महत्त्वाचे पूल वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता

Mumbai news : मुंबई : मुंबईतील वाहनचालकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

मुंबईकरांना मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये तीन महत्त्वाचे पूल वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता
मुंबईकरांना मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये तीन महत्त्वाचे पूल वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता

Mumbai news : मुंबई : मुंबईतील वाहनचालकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले तीन पूल ऑक्टोबर महिन्यात वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता आहे. यामध्ये ऑगस्ट 2024 पासून बंद असलेला सायन रेल्वे पूल, विद्याविहार रेल्वे ओव्हरब्रिज आणि गोरेगावमधील फ्लायओव्हरचा समावेश आहे. हे तिन्ही पूल वाहतुकीसाठी खुले झाल्यास मुंबईतील विविध भागांमधील वाहतूककोंडी कमी होण्यास मोठी मदत होऊ शकते.https://maharashtramirror.com/ Mumbai news

सायनचा पूल 15 ऑक्टोबरपर्यंत खुला करण्याचे नियोजन


सायन येथील तब्बल 112 वर्षे जुना रेल्वे पूल ऑगस्ट 2024 पासून वाहतुकीसाठी बंद आहे. पुलाच्या कामाला विलंब झाल्याने यापूर्वी काम पूर्ण करण्याची मुदत दोन वेळा वाढवण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

आता सायनचा हा पूल 15 ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पूल सुरू झाल्यानंतर सायन परिसरासह पूर्व द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

यासोबतच विद्याविहार रेल्वे ओव्हरब्रिज आणि गोरेगावमधील फ्लायओव्हरही ऑक्टोबरमध्ये सुरू झाल्यास मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share