Mumbai Police Latest News : 27 वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा फरार आरोपी अखेर जेरबंद! साकीनाका पोलिसांची मोठी कामगिरी
Mumbai Sakinaka Police Latest News : ओळख लपवून विरारमध्ये लपला होता 57 वर्षीय आरोपी; 1998 मधील गुन्ह्यात अखेर पडले बेड्या
1 min read

Mumbai Sakinaka Police Latest News : ओळख लपवून विरारमध्ये लपला होता 57 वर्षीय आरोपी; 1998 मधील गुन्ह्यात अखेर पडले बेड्या
मुंबई :- मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात Mumbai Sakinaka Police 1998 साली दाखल झालेल्या एका गुन्ह्यातील तब्बल 27 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला साकीनाका पोलिसांनी अखेर शोधून काढले आहे. लवु दत्ताराम ठाकूर (वय 57) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आपली ओळख लपवून हा आरोपी विरारमधील एका आलिशान इमारतीत राहत होता, मात्र साकीनाका पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. Mumbai Latest Crime News
नेमकी घटना काय?
साकीनाका पोलीस ठाण्यात 1998 मध्ये कलम 352,332 आणि 427 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आरोपी लवु ठाकूर हा तेव्हापासून फरार होता. अंधेरी येथील 66 व्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जाहीरनामा (Proclamation) वॉरंट जारी केले होते. गेली २७ वर्षे हा आरोपी पोलिसांना सतत गुंगारा देत होता.
विरारमधील नवीन पत्त्यावर रचला सापळा
साकीनाका पोलिसांच्या 'फरार आरोपी शोध पथकाने' आरोपीचा जुना पत्ता धुंडाळला असता तो तिथे मिळून आला नाही. मात्र, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपली ओळख बदलली असून तो सध्या वसई-विरार परिसरातील चंदनसार रोडवरील 'एम. व्ही. पॅराडाईज' या इमारतीत राहत असल्याचे समजले. 12 मार्च 2026 रोजी पोलिसांनी या नवीन पत्त्यावर सापळा रचला आणि 57 वर्षीय लवु ठाकूरला शिताफीने अटक केली.
पोलीस प्रशासनाचे कौतुक
ही यशस्वी कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह-पोलीस आयुक्त सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया आणि उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील यादव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस हवालदार सांडव आणि होळकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून 27 वर्षांपूर्वीचा 'पाहिजे असलेला' आरोपी अटक करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.


