Skip to content

Mumbai news : ओडिशावरून मुंबईत गांजाची तस्करी करणारा तस्कर घाटकोपर अँटी नार्कोटिक्स सेलच्या जाळ्यात; 22 किलो गांजासह 11.48 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Mumbai news :मुंबई :- ओडिशा राज्यातून बेकायदेशीर मार्गाने अंमली पदार्थ आणून मुंबईत त्याची थेट विक्री करणाऱ्या एका सराईत तस्कराचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (Anti Narcotics Cell) मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

ओडिशावरून मुंबईत गांजाची तस्करी करणारा तस्कर घाटकोपर अँटी नार्कोटिक्स सेलच्या जाळ्यात; 22 किलो गांजासह 11.48 लाखांचा मुद्देमाल जप्त!
ओडिशावरून मुंबईत गांजाची तस्करी करणारा तस्कर घाटकोपर अँटी नार्कोटिक्स सेलच्या जाळ्यात; 22 किलो गांजासह 11.48 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Mumbai news : लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ पोलिसांची धडक कारवाई; आरोपी मनिषकुमार चौधरीला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक

Mumbai news :मुंबई :- ओडिशा राज्यातून बेकायदेशीर मार्गाने अंमली पदार्थ आणून मुंबईत त्याची थेट विक्री करणाऱ्या एका सराईत तस्कराचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (Anti Narcotics Cell) मोठी आणि धडक कारवाई केली आहे. घाटकोपर युनिटच्या पथकाने टिळकनगर, चेंबूर परिसरात सापळा रचून 25 वर्षीय तस्कराला रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या तावडीतून तब्बल 22 किलो 960 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ 'गांजा' जप्त करण्यात आला असून, बाजारभावानुसार याची किंमत 11 लाख 48 हजार रुपये इतकी आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

लोकमान्य टिळक टर्मिनसबाहेर पोलिसांनी रचला सापळा

अंमली पदार्थ विरोधी कक्ष (गुन्हे शाखा, मुंबई) च्या घाटकोपर युनिटचे पथक 13 ऑक्टोबर 2026 रोजी परिसरात गस्त घालत होते. गस्तीदरम्यान सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड ब्रिजजवळ, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) रेल्वे स्थानकाबाहेरील गार्डनजवळ एक संशयित इसम अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.संशयित इसमाला तात्काळ ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या साहित्यातून तब्बल 22 किलो 960 ग्रॅम वजनाचा उच्च दर्जाचा 'गांजा' हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळीच सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

ओडिशा कनेक्शन उघड; आरोपीवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनिषकुमार बैजनाथ चौधरी (वय 25) असे आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले की, आरोपीने हा गांजा थेट ओडिशा राज्यातून मुंबईत आणला होता आणि तो मुंबईतील विविध लहान-मोठ्या विक्रेत्यांना विकण्याच्या तयारीत होता.
या कारवाईनंतर अंमली पदार्थ विरोधी कक्ष (गुन्हे शाखा) टिळक नगर पोलीस ठाणे येथे अन्वये एनडीपीएस (NDPS) कायदा 1985 च्या कलम 8(क) सह 20 (क) अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवून आरोपीला अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे. या तस्करीच्या रॅकेटमध्ये ओडिशातील मुख्य पुरवठादार कोण आहेत आणि मुंबईत हा माल कुणाला पोहोचवला जाणार होता, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई

ही धडक व यशस्वी कामगिरी बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त (अं.प.वि.कक्ष) पोर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली. घाटकोपर युनिटचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत आव्हाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील, पोलीस अंमलदार गोरे, कानडे, यशवंते, रावते, शिंदे, गोमासे, पंडित, गर्जे, साठे, महिला पोलीस हवालदार कोरपे, महिला पोलीस अंमलदार मुलाणी, विशे आणि पोलीस हवालदार घाडगे यांनी या धडक कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share