Mumbai Crime News: कॅटरिंग व्यावसायिकाला धमकावून मारहाण, कुख्यात गुंड 'चेंबूर अण्णा' गजाआड!
Mumbai Police Arrested Chembur Gangster Anna Arrested : खंडणी न दिल्याने बांबूने हल्ला, पीडित गंभीर जखमी; आरोपीवर 22 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल.
1 min read

Mumbai Police Arrested Chembur Gangster Anna Arrested : खंडणी न दिल्याने बांबूने हल्ला, पीडित गंभीर जखमी; आरोपीवर 22 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल.
मुंबई :- कॅटरिंग व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी आणि खंडणी न दिल्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी कुख्यात गुंड चेंबूर अण्णा उर्फ अजय मारीमुत्तु पेरिस्वामी याला अटक केली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यावसायिकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंबूर अण्णासोबत त्याचा साथीदार राहिल अमीद सय्यद (28 वय) यालाही अटक करण्यात आली आहे. Mumbai Police Latest News
मिळालेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय तक्रारदाराचा कॅटरिंगचा व्यवसाय असून, गेल्या अनेक दिवसांपासून चेंबूर अण्णा त्याला खंडणीसाठी धमकावत होता. तक्रारदाराने दुर्लक्ष केल्यानंतर आरोपींनी थेट त्याच्यावर हल्ला केला. सोमवारी रात्री तक्रारदार आपल्या वाशी नाका येथील घरात झोपले असताना, चेंबूर अण्णा, राहिल सय्यद आणि एक अनोळखी आरोपी त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. त्यांनी दरवाज्यावर लाथा मारून घरात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा खंडणीची मागणी केली.
तक्रारदाराने खंडणी देण्यास नकार देताच, चिडलेल्या चेंबूर अण्णाने त्याच्या डोक्यात बांबूने जोरदार प्रहार केला. इतर दोन आरोपींनीही त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात तक्रारदार गंभीर जखमी झाला. खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
या गंभीर घटनेनंतर तक्रारदाराने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून आरसीएफ पोलिसांनी त्वरित कारवाई करत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने तपास करत चेंबूर अण्णा आणि त्याच्या साथीदार राहिल सय्यदला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी चेंबूर अण्णा याच्यावर यापूर्वीच हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण, खंडणी आणि धमकावणे असे 22 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, साथीदार राहिल सय्यदवरही चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपींनी हल्ल्यासाठी वापरलेला लाकडी बांबू जप्त केला आहे. या प्रकरणातील तिसऱ्या फरार आरोपीचा शोध पोलीस घेत असून, आरसीएफ पोलीस अधिक तपास करत आहेत.


