Mumbai crime : मुंबईत मर्डर गुन्ह्यातील सराईत आरोपी 1.028 किलो एमडी ड्रग्ससह अटकेत; घाटकोपर युनिटची धडक कारवाई
Mumbai crime :मुंबई :- अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटच्या पथकाने गस्तीदरम्यान मुंबईत मोठी कारवाई करत तीन सराईत आरोपींना अटक केली आहे.
1 min read

Mumbai crime :बोरीवली पश्चिमेकडील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरातून तिघे जण जेरबंद; 3 कोटी 84 लाखांचा लाखांचा अमली पदार्थ जप्त
Mumbai crime :मुंबई :- अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटच्या पथकाने गस्तीदरम्यान मुंबईत मोठी कारवाई करत तीन सराईत आरोपींना अटक केली आहे. बोरीवली (पू) येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे समोरील एका कॉम्प्लेक्सजवळ अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या या तिन्ही संशयितांच्या झडतीत त्यांच्याकडून तब्बल 1 किलो 28 ग्रॅम वजनाचे 'एम.डी.' (मेफेड्रोन) हे मली पदार्थ हस्तगत करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 3 कोटी 84 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
मर्डर गुन्ह्यातील सराईत आरोपी आणि नालासोपाऱ्यातून आणला साठा
पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, अटक केलेले हे तिन्ही आरोपी खुनाच्या (मर्डर) गुन्ह्यातील सराईत आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी हा अमली पदार्थाचा साठा नालासोपारा येथून आणला होता आणि तो विक्री करण्यासाठी मुंबईत आले होते. या तिन्ही आरोपींकडून प्रत्येकी वय अनुक्रमे 28 वर्ष (दोन जण) आणि 39 वर्ष असलेल्या व्यक्तींचा समावेश असून, पोलिसांनी त्यांच्याकडून 3 कोटी 08 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यशस्वी कामगिरी
ही धडक कारवाई बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे आणि अपर आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींजी व सहायक पोलीस आयुक्त सुधीर हिर्डेकर यांच्या हाताखाली घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आडटे, पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या फत्ते केली आहे.


