Skip to content

Mumbai Crime : मुंबई गुन्हे शाखेची धडक कारवाई; 1.5 कोटींच्या दीड किलो चरससह एका आरोपीला अटक

Mumbai Crime : मुंबई :- मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-9 च्या पथकाने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत दीड कोटी रुपयांच्या चरससह एका आरोपीला अटक केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

मुंबई गुन्हे शाखेची धडक कारवाई; 1.5 कोटींच्या दीड किलो चरससह एका आरोपीला अटक
मुंबई गुन्हे शाखेची धडक कारवाई; 1.5 कोटींच्या दीड किलो चरससह एका आरोपीला अटक

Mumbai Crime : वांद्रे पश्चिम परिसरात छापा टाकून 1 किलो 505 ग्रॅम चरस जप्त; गुन्ह्यात सहभागी दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू

Mumbai Crime : मुंबई :- मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-9 च्या पथकाने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत दीड कोटी रुपयांच्या चरससह एका आरोपीला अटक केली आहे. 24 ऑक्टोबर 2026 रोजी वांद्रे पश्चिम येथील एका घरातून अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची अत्यंत खात्रीशीर व गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकून कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करत 1 किलो 505 ग्रॅम वजनाचा चरस हा अमली पदार्थ जप्त केला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai crime

एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आणि तस्कराची धडपकड

जप्त करण्यात आलेल्या या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार किंमत सुमारे 1 कोटी कोटी 50 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून एका 40 वर्षीय आरोपीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी एक आरोपी सहभागी असून तो सध्या फरार आहे; पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही उल्लेखनीय कामगिरी बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-1) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा युनिट-9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील, विजय धोत्रे, उपनिरीक्षक कल्याण पाटील, ऋषिकेश वाघरे व अंमलदारांच्या पथकाने हा यशस्वी छापा टाकला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share