Skip to content

Pune News : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय: ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेचे ४ व ७ दिवसांचे पास आता ऑनलाईन उपलब्ध

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि कारभारात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय: ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेचे ४ व ७ दिवसांचे पास आता ऑनलाईन उपलब्ध
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय: ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेचे ४ व ७ दिवसांचे पास आता ऑनलाईन उपलब्ध

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि कारभारात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेअंतर्गत दिले जाणारे चार दिवस आणि सात दिवसांचे पास आता ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापूर्वी हे पास एसटी आगारांमधून (डेपो) केवळ हस्तलिखित पद्धतीनेच वितरीत केले जात होते. मात्र, प्रवाशांना ते सहजरीत्या आणि पारदर्शक पद्धतीने मिळावेत, या उद्देशाने प्रशासनाने ही सुविधा ऑनलाईन केली आहे. असा काढता येईल ऑनलाईन पासप्रवाशांना आता एसटी महामंडळाच्या https://npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आवश्यक ती माहिती भरून नियमानुसार ४ किंवा ७ दिवसांचा पास ऑनलाईन काढता येणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

प्रवासादरम्यान पासाची पडताळणी कशी होणार?


ऑनलाईन काढलेल्या पासवर प्रवाशांना प्रवास करण्याची कार्यपद्धती खालीलप्रमाणे असेल: पासचे स्वरूप: ऑनलाईन पासची प्रिंटout किंवा प्रवाशाच्या मोबाईलमधील डिजिटल PDF स्वरूप वैध मानले जाईल.
क्यू आर कोड स्कॅनिंग: बसमधील वाहक (कंडक्टर) त्यांच्या ‘ईटीआय’ (ETI) मशीनद्वारे पासवरील क्यूआर कोड स्कॅन करतील.
माहितीची पडताळणी: स्कॅन केल्यानंतर मशीनवर प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार आणि वैधतेची मुदत दिसेल.
ओळखपत्र अनिवार्य: वाहक प्रवाशाचे अधिकृत ओळखपत्र (उदा. पॅनकार्ड, किंवा डिजीलॉकरमधील ओळखपत्र) तपासून प्रवासाची अनुमती देतील.
अडचण आल्यास संपर्क: क्यूआर कोड स्कॅन न झाल्यास प्रवाशांनी ०८०६५९०३२७२ किंवा ०८०६५९०३२७३ या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधून पडताळणी करायची आहे. एसटी महामंडळाने याबाबत राज्यातील सर्व विभागीय नियंत्रक, आगार व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या असून आगार पातळीवर सूचना फलक व स्थानिक प्रसिद्धीद्वारे प्रवाशांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन एस.टी.विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share