Skip to content

Pune news : एमपीएससी आंदोलनावर भाजपचा ‘व्हिडीओ बॉम्ब’; नवनाथ बन यांचे रोहित पवारांवर गंभीर आरोप

Pune news :पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षार्थ्यांच्या आंदोलनावरून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

एमपीएससी आंदोलनावर भाजपचा ‘व्हिडीओ बॉम्ब’; नवनाथ बन यांचे रोहित पवारांवर गंभीर आरोप
एमपीएससी आंदोलनावर भाजपचा ‘व्हिडीओ बॉम्ब’; नवनाथ बन यांचे रोहित पवारांवर गंभीर आरोप

Pune news :पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षार्थ्यांच्या आंदोलनावरून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. आंदोलनाच्या ठिकाणी विद्यार्थी नसून राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग अधिक असल्याचा दावा करत बन यांनी मध्यरात्रीच्या कथित प्रकारांचा एक व्हिडीओही माध्यमांसमोर दाखवला.https://maharashtramirror.com/ Pune News

नवनाथ बन यांच्या दाव्यानुसार, ३ आणि ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री युवक काँग्रेसचे नेते शिवराज मोरे हे एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर ते मध्यरात्रीच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरात गेले. त्यांच्यासोबत काँग्रेसशी संबंधित आणखी दोन कार्यकर्ते असल्याचा दावा बन यांनी केला. या ठिकाणी मद्यपान केल्यानंतर रस्त्यावर वाद घालण्यात आल्याचा आणि एका मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोपही त्यांनी केला. या दाव्यांच्या समर्थनार्थ संबंधित व्हिडीओ असल्याचे बन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune News


‘आंदोलनात २० टक्के विद्यार्थी, ८० टक्के कार्यकर्ते’
रोहित पवार यांच्या आंदोलनावर पहिल्या दिवसापासूनच राजकीय आंदोलनाचा आरोप करत असल्याचे बन यांनी सांगितले. त्यांच्या मते, आंदोलनात केवळ २० टक्के विद्यार्थी असून उर्वरित मोठ्या संख्येने राजकीय कार्यकर्ते सहभागी आहेत. आंदोलनाला राजकीय स्वरूप देण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वीही भाजपकडून आंदोलनाच्या राजकीयीकरणाचा आरोप करण्यात आला आहे.
बन यांनी रोहित पवार यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. ‘रोहित पवारांनी स्वतः कधी एमपीएससीचा फॉर्म भरलेला नाही,’ असे म्हणत त्यांनी पवारांच्या राजकीय पार्श्वभूमीवरही निशाणा साधला. आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.


‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आमचा आक्षेप नाही’

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना आपला विरोध नसून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे बन यांनी स्पष्ट केले. मात्र, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली राजकीय कार्यकर्त्यांकडून वेगळे प्रकार सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे.
दरम्यान, एमपीएससीच्या विविध मागण्यांवरून पुण्यात आंदोलन सुरू असून रोहित पवार या आंदोलनात सक्रिय सहभागी आहेत. एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह परीक्षा प्रक्रिया आणि पेपरफुटीच्या मुद्द्यांवरून आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. भाजपच्या या आरोपांवर रोहित पवार यांनी यापूर्वी नवनाथ बन यांचे आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध भागांतून लोक येत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एमपीएससी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आता विद्यार्थ्यांच्या मागण्यांसोबतच राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share