Skip to content

Pune News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा; आर्थिक देवाणघेवाणीप्रकरणी 6 वरिष्ठ अधिकारी निलंबित!'

Pune News :पुणे :- राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाया सुरू असतानाच, आता प्रशासकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा; आर्थिक देवाणघेवाणीप्रकरणी 6 वरिष्ठ अधिकारी निलंबित!
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा; आर्थिक देवाणघेवाणीप्रकरणी 6 वरिष्ठ अधिकारी निलंबित!

Pune News : उद्योगांना परवाने देताना कथित आर्थिक व्यवहारांचे आरोप; पुण्याच्या प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांवर धडक कारवाई'

Pune News :पुणे :- राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाया सुरू असतानाच, आता प्रशासकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) पुण्यातील कार्यालयातून 6 वरिष्ठ आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे. उद्योगांना उभारणीसाठी (CTE) आणि संचालनासाठी (CTO) परवानग्या देण्याच्या प्रक्रियेदरम्यान कथित आर्थिक देवाणघेवाण केल्याचा गंभीर आरोप या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे

उद्योगांच्या परवानग्या देताना व्हिडिओ पुराव्यांसह आर्थिक व्यवहारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस बजावून खुलासे मागवण्यात आले होते, परंतु त्यांचे खुलासे असमाधानकारक ठरल्याने सक्षम प्राधिकाऱ्यांनी ते फेटाळून लावले.

कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तनाचा ठपका ठेवून खालील 6 अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीच्या अधीन राहून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

बाबासाहेब कुकडे (प्रादेशिक अधिकारी)

नवनाथ अवताडे (उपप्रादेशिक अधिकारी)

कार्तिकेय लंगोटे (उपप्रादेशिक अधिकारी)

सुषमा कुंभार (क्षेत्रीय अधिकारी)

जयंत डोके (क्षेत्रीय अधिकारी)

अजय खामकर (क्षेत्रीय अधिकारी)

मुख्यालय मुंबई येथे निश्चित; पूर्वपरवानगीशिवाय बाहेर पडण्यास प्रतिबंध

निलंबनाच्या या कालावधीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यालय मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात निश्चित करण्यात आले आहे. तसेच, नियंत्रण अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना आपले मुख्यालय सोडता येणार नाही, असे स्पष्ट आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share