Skip to content

Mumbai News : माउंट मेरी यात्रेसाठी वांद्र्यात वाहतूक बदल

Mumbai News :मुंबई, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : वांद्र्यातील प्रसिद्ध माउंट मेरी यात्रेसाठी लाखो भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

माउंट मेरी यात्रेसाठी वांद्र्यात वाहतूक बदल १३ ते २० सप्टेंबरदरम्यान विशेष नियोजन; माउंट मेरी रोडवर वाहनांना प्रवेशबंदी, ११ मार्गांवर पार्किंगला मनाई
माउंट मेरी यात्रेसाठी वांद्र्यात वाहतूक बदल १३ ते २० सप्टेंबरदरम्यान विशेष नियोजन; माउंट मेरी रोडवर वाहनांना प्रवेशबंदी, ११ मार्गांवर पार्किंगला मनाई

१३ ते २० सप्टेंबरदरम्यान विशेष नियोजन; माउंट मेरी रोडवर वाहनांना प्रवेशबंदी, ११ मार्गांवर पार्किंगला मनाई

Mumbai News :मुंबई, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : वांद्र्यातील प्रसिद्ध माउंट मेरी यात्रेसाठी लाखो भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. १३ ते २० सप्टेंबरदरम्यान माउंट मेरी रोडसह परिसरातील काही रस्त्यांवर वाहनांना प्रवेशबंदी, एकदिशा वाहतूक, अवजड वाहनांना मनाई आणि ‘नो-पार्किंग’चे निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai News

माउंट मेरी चर्च येथे १३ ते २० सप्टेंबरदरम्यान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या काळात मोठ्या संख्येने भाविक चर्चला भेट देत असल्याने माउंट मेरी परिसरासह वांद्रे वाहतूक विभागातील रस्त्यांवर कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि वाहतुकीतील अडथळे टाळण्यासाठी पोलीस उपआयुक्त (मुख्यालय व मध्य विभाग), वाहतूक मुंबई डॉ. दिपाली घाटे यांनी तात्पुरती वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

अधिसूचनेनुसार, माउंट मेरी रोड सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सर्वसामान्य वाहनांसाठी बंद राहणार आहे. स्थानिक पासधारक रहिवाशांची वाहने, पोलीस आणि आपत्कालीन सेवांच्या वाहनांना मात्र प्रवेश दिला जाईल. सेंट जॉन बॅप्टीस्ट रोडवरही याच वेळेत स्थानिक पासधारक रहिवासी आणि आपत्कालीन वाहने वगळता अन्य वाहनांना प्रवेशबंदी राहील.https://maharashtramirror.com/Mumbai News

केन रोडवर माउंट मेरी रोडकडून बी. जे. रोडच्या दिशेने एकदिशा वाहतूक राहणार असून, बी. जे. रोडकडून प्रवेश बंद असेल. परेरा रोडवर पूर्वेकडून पश्चिमेकडे एकदिशा वाहतूक राहील आणि बी. जे. रोडकडून या मार्गावर प्रवेश करता येणार नाही. तसेच कारमेल चर्च परिसरात चॅपेल रोडकडून वेरोनिका रोडकडे जाणारे उजवे वळण बंद ठेवण्यात येणार आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

यात्रेच्या आठ दिवसांच्या कालावधीत सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत के. सी. मार्ग, चॅपेल रोड, सेंट जॉन बॅप्टीस्ट रोड, सेंट सिबेस्टीयन रोड, माउंट कारमेल रोड, माउंट मेरी रोड, बी. जे. रोड आणि केन रोडवर अवजड वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे प्रवाशांना वाहनातून चढण्या-उतरण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी वगळता माउंट मेरी रोड, परेरा रोड, केन रोड, हिल रोड (सेंट पॉल रोड ते मेहबूब सर्कल), माउंट कारमेल रोड, चॅपेल रोड, जॉन बॅप्टीस्ट रोड, सेंट सॅबेस्टीन रोड, रिबेलो रोड, डॉ. पिटर डायस रोड आणि सेंट पॉल रोड या ११ मार्गांच्या दोन्ही बाजूंना वाहनांचे पार्किंग आणि वाहने थांबविण्यास सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत मनाई राहणार आहे.

हे सर्व तात्पुरते वाहतूक निर्बंध १३ सप्टेंबरपासून २० सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच वाहनचालकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Share