Pune Crime : मोशीत ऑईल खरेदीवर डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंपावरील कामगारावर रोखले पिस्तूल
Pune Crime : पिंपरी: मोशी येथे एका पेट्रोल पंपावर एक लिटर ऑइल खरेदी केल्यानंतर त्यावर डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारावर पिस्तूल रोखले.
3 min read

Pune Crime : पिंपरी: मोशी येथे एका पेट्रोल पंपावर एक लिटर ऑइल खरेदी केल्यानंतर त्यावर डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारावर पिस्तूल रोखले. तसेच कामगाराला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (१८ ऑक्टोबर) पहाटे वाघजाई पेट्रोल पंप, मोशी येथे घडली.https://maharashtramirror.com/ Pune Crime
या प्रकरणात रेवन राजाराम पांढरे (३३, रा. आळंदी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी देवानंद उर्फ देवा भिमाशंकर जमादार (२९, रा. किवळे), सुलतान इसुफ खान (३२, रा. देहुरोड), विलास धाऊ ढेबे (२९, रा. दिघी), काशिनाथ कल्याण काळे (२८, रा. दिघी-आळंदी रोड) या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह कुणाल साहेबराव रणवीर (२२, रा. म्हाळुंगे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघजाई पेट्रोल पंप, मोशी येथे काम करतात. रविवारी पहाटे ते पंपावर काम करत असताना एक कार पेट्रोल पंपावर आली. कारमध्ये चार जण बसलेले होते. त्यातील एकाने ऑइलचा भाव विचारला. फिर्यादी रेवन यांनी ऑइलचा भाव सांगितला. ऑइल खरेदीमध्ये डिस्काउंट बाबत आरोपींनी विचारणा केली. मात्र त्याचा भाव फिक्स असून त्यामध्ये कोणताही डिस्काउंट मिळणार नसल्याचे रेवन यांनी सांगितले. ऑइलचा भाव जास्त असल्याने ते खरेदी करणार नसल्याचे सांगून आरोपी कारमध्ये बसून पेट्रोल पंपाच्या एका बाजूला गेले. काही वेळाने आरोपी पुन्हा खाली आणि त्यांनी एक लिटर ऑइल खरेदी केले. त्यानंतर डिस्काउंट न दिल्याच्या रागातून एका आरोपीने "मी देवा जमादार आहे, तुला मारूनच टाकतो" अशी धमकी देत आपल्या कमरेला लावलेले पिस्तूल काढून रेवन यांच्या दिशेने रोखले, ज्यामुळे आजूबाजूचे ग्राहक पळून गेले. त्यानंतर ते चौघे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून निघून गेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
तळेगाव दाभाडे येथे जादा परताव्याचे आमिष दाखवून महिलेची आर्थिक फसवणूक
पिंपरी: तळेगाव दाभाडे येथे टेलिग्राम आणि बँक खात्याच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देऊन जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करण्यात आली. ही घटना २४ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत भीमाशंकर कॉलनी, वराळे, तळेगाव दाभाडे येथे घडली.
या प्रकरणात एका महिलेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बँक खातेधारक आणि टेलिग्राम खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला वेगवेगळे टास्क देऊन त्यावर जादा परतावा मिळण्याचे आमिष दाखवले. याद्वारे फिर्यादीची एकूण ५ लाख ६ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली गेली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
कासारवाडीत शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास अटक
पिंपरी: कासारवाडी येथे बेकायदेशीरपणे कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले. ही कारवाई रविवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी दत्त मंदिरासमोर, कासारवाडी येथे करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस शिपाई नितीन संकुनहट्टे यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मण उर्फ लक्या धनंजय चव्हाण (२०, कासारवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या ताब्यात १०० रुपये किमतीचा एक कोयता बेकायदेशीररीत्या जवळ बाळगला होता. पोलिसांना माहिती मिळताच त्याच्यावर कारवाई करत त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.
चऱ्होलीत विनापरवाना पिस्तूल बाळगणारा तरुण अटकेत
पिंपरी: चऱ्होली येथे बेकायदेशीरपणे देशी पिस्तूल आणि काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (१८ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खंडोब माळा रोड, चऱ्होली येथे करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल सुधीर डोळस यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनुसत्ती ओम रामदास मुंगसे (२१, रा. खेड) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात हत्यारे बाळगण्यास मनाई असणारा आदेश लागू असतानाही, आरोपीने त्या आदेशाचा भंग केला. त्याने आपल्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक राउंड अशी एकूण ५१,००० रुपये किमतीची शस्त्रसामग्री विनापरवाना बाळगल्याचे आढळून आले. दिघी पोलीस तपास करत आहेत.


