Skip to content

Moshi Garbage Depot : एएलआर कंपनीच्या प्रोजेक्ट हेड आणि सेफ्टी ऑफिसरला अटक

पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र मिरर

M
Mubarak

2 min read

Moshi Garbage Depot

Moshi Garbage Depot : दोन वरिष्ठ अभियंत्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटीस; निलंबनासह विभागीय चौकशीचा इशारा

पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र मिरर

Moshi Garbage Depot : मोशी येथे घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत एएलआर (ALR) कंपनीच्या प्रोजेक्ट हेड आणि सेफ्टी ऑफिसरला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. (Moshi Garbage Depot  alr company officials arrested)

दोन वरिष्ठ अभियंत्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटीस; निलंबनासह विभागीय चौकशीचा इशारा

पिंपरी : मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून नऊ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश सोपान आळ्हाट आणि मुख्य अभियंता-१ संजय नारायण कुलकर्णी यांना स्वतंत्र कारणे दाखवा नोटिसा बजावत गंभीर निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर आणि सुरक्षेबाबत अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवला आहे. (Moshi Garbage Depot )

Moshi : ९ कामगारांच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नोटिशीत नमूद केल्यानुसार, मोशी कचरा डेपोच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची स्थिती तपासणे, सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आणि कंत्राटदाराकडून सुरक्षा नियमांचे पालन करून घेणे ही संबंधित अधिकाऱ्यांची थेट जबाबदारी होती. मात्र या जबाबदाऱ्यांमध्ये गंभीर त्रुटी राहिल्याने ८ जुलै रोजी कचऱ्याचा मोठा ढिगारा खचून लगतच्या आरसीसी इमारतीवर कोसळला आणि त्यात नऊ कामगारांचा मृत्यू झाला, असे नोटिशीत म्हटले आहे. (Moshi Garbage Depot )

महापालिकेने प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. २०१९ च्या मूळ प्रस्तावात ही इमारत सॅनिटरी लँडफिलपासून ३० मीटर अंतरावर प्रस्तावित होती. मात्र २०२३ मधील सुधारित प्रस्तावानुसार तळमजल्यालाच परवानगी असताना प्रत्यक्षात इमारत केवळ १२ मीटर अंतरावर उभारण्यात आली. तसेच अधिकृत मंजुरीशिवाय पहिला व दुसरा मजला बांधल्याचा संशयही नोटिशीत व्यक्त करण्यात आला आहे. मंजूर आराखड्यानुसारच बांधकाम होत आहे की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची असल्याचे नमूद करत या प्रकरणात प्रशासकीय संरक्षण किंवा कंत्राटदाराशी संगनमताची शक्यता फेटाळता येत नसल्याचेही नोटिशीत म्हटले आहे.

Maharera : बिल्डर नागपाल यांना दणका: १ कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश

दुर्घटनेनंतर वरिष्ठ अधिकारी आणि शासनाला एसएलएफ व इमारतीतील अंतर तसेच अनधिकृत बांधकामाबाबत चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्यात आल्याचाही आरोप नोटिशीत करण्यात आला आहे. (Moshi Garbage Depot )

तसेच उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार Solid Waste Management Rules, 2016, CPHEEO मार्गदर्शक तत्त्वे, तसेच CPCB आणि MPCB यांच्या सुरक्षा व पर्यावरणीय नियमांचे पालन करण्यात गंभीर त्रुटी राहिल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सॅनिटरी लँडफिलचे सुरक्षित व्यवस्थापन, ढिगाऱ्याची स्थिरता, पर्जन्यजल व्यवस्थापन, जोखीम विश्लेषण, नियमित निरीक्षण आणि धोक्यांचे मूल्यांकन या बाबींमध्येही गंभीर हलगर्जीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहे. (Moshi Garbage Depot )

दोन्ही अधिकाऱ्यांना विभागाकडे प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी, त्यावर करण्यात आलेली कार्यवाही, दुर्घटना टाळण्यासाठी राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संबंधित अभिलेखांसह सविस्तर खुलासा मंगळवार, १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Moshi Garbage Depot )

ATS Raid : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ATS ची छापेमारी

तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६(२) आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी व कडक शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, तसेच जीवितहानीच्या या गंभीर दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून त्यांना तात्काळ निलंबित का करण्यात येऊ नये, याबाबतही खुलासा मागविण्यात आला आहे. मुदतीत समाधानकारक उत्तर न दिल्यास  नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.

https://www.instagram.com/reel/DarnRCgtO_e/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

Share