Mira Road Crime News : प्रवासी बनून रिक्षात बसला आणि निर्जन स्थळी चाकू उपसला! चालकाला लुटून रिक्षा पळवणाऱ्या भामट्याला काशिमीरा गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
Mira Road Latest Crime News : लघवीचा बहाणा करून रिक्षा थांबवली अन् चालकावर केला हल्ला; पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मिराकी हॉटेलजवळून उचलले un
2 min read

Mira Road Latest Crime News : लघवीचा बहाणा करून रिक्षा थांबवली अन् चालकावर केला हल्ला; पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मिराकी हॉटेलजवळून उचलले un
मीरा रोड/काशिमीरा | भाड्याने रिक्षा प्रवास करत असताना रिक्षा चालकालाच चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि त्याची रिक्षा लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष-1 च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. 21 वर्षीय तौहीद आलम मोनीश खान असे या आरोपीचे नाव असून, अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे. Mira Road Latest Crime News
निर्जन स्थळी चालकावर चाकूचा वार करण्याचा प्रयत्न
25 डिसेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास रिक्षा चालक अनिरुद्ध यादव हे काशिमीरा नाका येथे भाड्याची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी आरोपी तौहीद याने प्रवासाच्या बहाण्याने रिक्षा भाड्याने घेतली. त्याने सुरुवातीला फाऊंटन हॉटेलच्या दिशेने आणि त्यानंतर घोडबंदर गावाकडे रिक्षा नेण्यास सांगितले. घोडबंदर परिसरात एका निर्जन ठिकाणी पोहोचताच त्याने लघवीचे बहाणा करून रिक्षा थांबवायला सांगितली. रिक्षा थांबताच त्याने आपला खरा चेहरा दाखवत चालकाच्या मानेला चाकू लावला आणि 4,200 रुपयांची रोकड व रिक्षा (क्र. MH-47-C-6452) घेऊन पसार झाला.
काशिमीरा पोलिसांचा समांतर तपास आणि सापळा
या घटनेनंतर काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1 चे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तौहीद हा मुंबई-अहमदाबाद हायवेवरील 'मिराकी हॉटेल' जवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने हॉटेल परिसरात सापळा रचला आणि आरोपीला घेराव घालून ताब्यात घेतले.
गुन्ह्याची कबुली आणि आरोपीचा पत्ता
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने लुटमार केल्याची कबुली दिली. आरोपी तौहीद आलम खान हा काशिमीरा येथील धाचकुलपाडा परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला पुढील कारवाईसाठी काशिगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
या पथकाने केली धडाकेबाज कामगिरी
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा कक्ष-1 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, सचिन सानप आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.


