महापौरांनी घेतला मान्सून पूर्व तयारीच्या कामकाजाचा आढावा
१५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नालासफाईच्या कामाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली
1 min read

१५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नालासफाईच्या कामाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली
निलेश राऊत
पुणे: मान्सूनच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मलनि:सारण विभागाअंतर्गत मान्सून पूर्व तयारीच्या दृष्टीने चालू असलेल्या कामकाजाचा आढावा गुरुवारी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पुणे शहरात जी नालासफाई चालू आहे त्या कामकाजाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीमती कौर, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर उपस्थित होते. त्याचबरोबर विविध खात्यांचे खाते प्रमुखही उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये तसेच NDMA च्या अंतर्गत केंद्र सरकारकडून पुणे महापालिकेसाठी जे प्रकल्प मंजूर आहेत त्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला गेला. त्याच बरोबर आपत्ती व्यवस्थापन विभाग, पथ विभाग, पर्यावरण विभाग व इतर संबंधित विभागांचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.
सदर बैठकीच्या शेवटी सर्व खाते प्रमुखांना चालू असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही महापौर यांनी यावेळी दिल्या.
Mayor reviews pre-monsoon preparations


