Maval : मावळ तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना; घरावर कोसळली दरड, एकाचा मृतदेह हाती
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 min read

Maval : एकाचा मृतदेह हाती; संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
पुणे, महाराष्ट्र मिरर
Maval : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या पाटण गावात पहाटेच्या सुमारास एका घरावर भीषण दरड कोसळली. या दुर्दैवी घटनेत संपूर्ण घर ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून, एकाच कुटुंबातील सदस्य या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे. (maval patan village landslide)
पहाटेच्या सुमारास काळाचा घाला
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवार (६ जुलै) रोजी पहाटे ६:०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरमाथ्यावरील माती आणि खडक निखळले आणि ते थेट पायथ्याशी असलेल्या घरांवर येऊन कोसळले. सर्व नागरिक गाढ झोपेत असतानाच ही दुर्घटना घडल्यामुळे कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.(Maval)
Missing Link : ‘मिसिंग लिंक’ की ‘भ्रष्टाचाराची लिंक’? पहिल्याच पावसात प्रकल्पाचे पितळ उघडे!
एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश, शोधमोहीम सुरू
घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार, स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेचे गांभीर्य पाहून तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पुणे येथील ५ व्या बटालियनला पाचारण करण्यात आले. ३० जवानांचे हे विशेष पथक अत्याधुनिक शोध उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाले आहे.
हेही वाचा: Rain Update : खासगी कंपन्यांना 'वर्क फ्रॉम होम', तर शासकीय कार्यालयांना 'हाफ डे'
बचाव कार्य करणाऱ्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी ३ ते ४ जण दबले गेले असण्याची शक्यता वर्तवली जात असून, जवानांकडून अत्यंत काळजीपूर्वक आणि युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. (Maval)
https://www.instagram.com/p/DacAcuZotOG
संपूर्ण मावळ परिसरात हाय अलर्ट; इतर भागातही मदतकार्य सुरू
पाटण गावातील या मुख्य दुर्घटनेव्यतिरिक्त मावळ परिसरातील अनेक सखल भागांत आणि मळवली परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.(Maval)
Alandi Flood: इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी; २५० वारकरी अडकले
लोणावळा पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दलचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना करत आहे. या अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि जुन्या महामार्गावरील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून, प्रशासनाने नागरिकांना विनाकारण प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.
संपूर्ण मावळ परिसरावर या घटनेमुळे शोककळा पसरली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेले इतर लोक सुखरूप बाहेर यावेत यासाठी स्थानिक ग्रामस्थ प्रार्थना करत आहेत.


