Jalana News : मराठवाड्यात पावसाची दडी; खरीप पिके सुकल्याने शेतकरी संकटात
Jalana News जालना : जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.
1 min read

Jalana News जालना : जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला असून, हजारो हेक्टरवरील सोयाबीन, मका, तूर यांसह विविध पिके सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत.https://maharashtramirror.com/ Jalana News
पेरणीनंतर सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांना चांगली सुरुवात झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Jalana News
पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक भागांत पिके करपण्यास सुरुवात झाली असून, पावसाने आणखी दडी मारल्यास खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.https://maharashtramirror.com/ jalana News
दरम्यान, प्रशासनाने पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे. आता पावसाने पुन्हा हजेरी लावून पिकांना जीवदान मिळणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


