Skip to content

Jalna News : ‘तीन महिने काहीच बोलणार नाही’; षडयंत्र रचले तरी मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा

Jalna News : जालना : मराठा समाजाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने प्रत्येक आंदोलनावेळी वेळ मागून घेतला.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

‘तीन महिने काहीच बोलणार नाही’; षडयंत्र रचले तरी मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा
‘तीन महिने काहीच बोलणार नाही’; षडयंत्र रचले तरी मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा

Jalna News : जालना : मराठा समाजाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने प्रत्येक आंदोलनावेळी वेळ मागून घेतला. मात्र, दिलेल्या वेळेत मागण्या मान्य करण्याऐवजी मला एकटं पाडण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केला. यावेळी त्यांनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला असून, या काळात आपण कोणतेही वक्तव्य करणार नसल्याचे स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Jalna News

“मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र, सरकारकडून पुन्हा पूर्वीप्रमाणेच गोष्टी केल्या जात आहेत. माझ्याविरोधात कितीही षडयंत्र रचले, माझ्या जवळच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी मी मागे हटणार नाही,” असे मनोज जरांगे यांनी म्हटले. https://maharashtramirror.com/ Jalna News

तसेच, पुढील तीन महिने आपण कोणत्याही विषयावर बोलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “अंतरवाली सराटीतून एखादी भगिनी माझ्यावर टीका करत असेल तर करू द्या. त्यावर मी काहीही बोलणार नाही,” असेही जरांगे यांनी सांगितले.

अंतरवाली सराटीने मराठा समाजाला आंदोलनाच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ दिले आहे. त्यामुळे कोणी गैरसमजातून टीका केली असेल, तर त्याला कोणीही उत्तर देऊ नये, असे आवाहनही जरांगे यांनी मराठा समाजाला केले.

दरम्यान, व्यासपीठ काढण्यात आल्यावरून होणाऱ्या टीकेवरही त्यांनी भाष्य केले. “अंतरवाली सराटीतील काही लोकांना वाटत असेल की, मी पुन्हा तिथून आंदोलन करावे, तर त्यांनी व्यासपीठ उभारावे. मी आंदोलनासाठी तयार आहे,” असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत, कोणत्याही दबावाला किंवा षडयंत्राला बळी पडणार नसल्याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share