Jalna News: मनोज जरांगे यांचे समाजाला मुंबईकडे जाण्याचे आवाहन
Jalna News: जालना - मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
1 min read

मराठा आरक्षण मागणीवरून वातावरण तापणार
Jalna News: जालना - मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मुंबईकडे जाण्याचे आवाहन केले आहे. “आजपासून मराठा बांधवांनी मुंबईकडे जायला सुरुवात करा आणि १२ तारखेपर्यंत मुंबईत पोहोचा,” असे आवाहन त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना केले.जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने एकाच वेळी मुंबईत न जाता हळूहळू मुंबईकडे जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर सुरुवातीला पाहुण्यांकडे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.https://maharashtramirror.com/ Jalna News
आझाद मैदानावर लगेच जाऊ नका
“फक्त आझाद मैदानावर जाऊ नका. हळूहळू मुंबईला जायला सुरुवात करा,” असे जरांगे पाटील म्हणाले. मुंबईत अगोदर पोहोचलेल्या मराठा बांधवांनी आझाद मैदान किंवा वर्षा बंगल्यावर जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले. “आपण मी आल्यावर अचानक घुसू,” असे वक्तव्य करत त्यांनी आंदोलनाच्या पुढील रणनीतीचे संकेत दिले.https://maharashtramirror.com/ Jalna News
तसेच, पोलिसांनी अडवले तर मुंबईकडून येणारे कार्यकर्ते पुढे येतील, असेही त्यांनी म्हटले. मात्र, पोलिसांना त्रास देऊ नका, असे आवाहन करताना “आपल्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघायचे आहे,” असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.


