Skip to content

Jalna News : अंतरवाली सराटीत सरकारचे शिष्टमंडळ दाखल; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Jalna News : जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा गुरुवारी (दि.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

अंतरवाली सराटीत सरकारचे शिष्टमंडळ दाखल; मनोज जरांगे उपोषणावर ठाम
अंतरवाली सराटीत सरकारचे शिष्टमंडळ दाखल; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Jalna News : जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा गुरुवारी (दि. ३) सहावा दिवस होता. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाचे शिष्टमंडळ रात्री उशिरा अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. त्यानंतर मनोज जरांगे यांच्यासोबत शिष्टमंडळाची चर्चा सुरू झाली.https://maharashtramirror.com/ Jalna News
राज्य सरकारच्या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सरकारकडून जरांगे यांच्या मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. मनोज जरांगे यांनी आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका शिष्टमंडळासमोर स्पष्ट केली.https://maharashtramirror.com/ Jalna News
दरम्यान, सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यातील चर्चेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार काय निर्णय घेते आणि जरांगे त्यावर काय भूमिका घेतात, याकडे मराठा समाजासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष आहे.

Share