Skip to content

Jalna News : जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता; मराठा आंदोलकांचा महामार्गावर रास्ता रोको

Jalna News : जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता; मराठा आंदोलकांचा महामार्गावर रास्ता रोको
जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता; मराठा आंदोलकांचा महामार्गावर रास्ता रोको

Jalna News : जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. वडीगोद्री फाट्यासमोर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी महामार्गावरच जेवणाची पंगत मांडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Jalna News
मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. जरांगे यांच्या प्रकृतीची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. सरकारने दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.https://maharashtramirror.com/ Jalna News
दरम्यान, काल अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरूच असून, मराठा आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. https://maharashtramirror.com/ Jalna News

महामार्गावरच जेवणाची पंगत


रास्ता रोको आंदोलनादरम्यान आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या देत चिवडा खाल्ला. काही आंदोलकांनी रस्त्यावर जेवणाची पंगत मांडली. त्यामुळे धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. पोलिसांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याची विनंती केली; मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.https://maharashtramirror.com/ Jalna News
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
• मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा.
• मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा.
• जरांगे यांच्या प्रकृतीची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.
• चर्चेतून ठोस तोडगा काढावा.
• मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा निर्धार.

Share