Chatrpati Sambhajinager : मनोज जरांगे यांचा 'ऑडिओ क्लिप' बॉम्ब
Chatrpati Sambhajinager : कथित पुराव्यात श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगेंना ५०० कोटी दिल्याचा दावा; मराठा आरक्षण आंदोलन कमकुवत करण्यासाठी आणि जरांगे यांच्याविरोधात वातावरण तयार करण्यासाठी पद्धतशीरपणे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप https://maharashtramirror.com/ Chatrpati Sambhajinager
3 min read

Chatrpati Sambhajinager :कथित पुराव्यात श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगेंना ५०० कोटी दिल्याचा दावा; मराठा आरक्षण आंदोलन कमकुवत करण्यासाठी आणि जरांगे यांच्याविरोधात वातावरण तयार करण्यासाठी पद्धतशीरपणे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोपhttps://maharashtramirror.com/ Chatrpati Sambhajinager
Chatrpati Sambhajinager :महत्वाचे मुद्दे
*गेल्या तीन वर्षांपासून आपल्या आणि संपूर्ण मराठा आंदोलनाच्या विरोधात विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचा जरांगेचा आरोप
*ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या वर्तुळातील आणि आयटी सेलशी संबंधित व्यक्तींच्या संभाषणाचा दावा
*जरांगे यांचा वाढता प्रभाव आणि जनमानसातील प्रतिमा डागाळण्यासाठी काही विशिष्ट रणनीती आखण्यात आली
*विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडी आणि व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमुळे सत्ताधाऱ्यांवर मोठे प्रश्नचिन्ह
*जरांगे यांनी कुठलाही आरोप करण्यापूर्वी त्याची योग्य शहानिशा करायला हवी होती, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणेhttps://maharashtramirror.com/ Chatrpati Sambhajinager
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजकारणात आणि मराठा आंदोलनात एकच खळबळ उडवून देणारी एक ऑडिओ क्लिप उघड केली आहे.https://maharashtramirror.com/ Chatrpati Sambhajinager
या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून मराठा आरक्षण आंदोलन कमकुवत करण्यासाठी आणि जरांगे यांच्याविरोधात वातावरण तयार करण्यासाठी पद्धतशीरपणे षडयंत्र रचण्यात आल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून आपल्या आणि संपूर्ण मराठा आंदोलनाच्या विरोधात विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.
ऑडिओ क्लिपमधील धक्कादायक दावे आणि चर्चा
पत्रकार परिषदेत सादर करण्यात आलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या वर्तुळातील आणि आयटी सेलशी संबंधित व्यक्तींच्या संभाषणाचा दावा करण्यात आला आहे. जरांगे यांचा मराठा समाजातील वाढता प्रभाव आणि जनमानसातील प्रतिमा डागाळण्यासाठी काही विशिष्ट रणनीती आखण्यात आल्याचे या संभाषणात दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने पुढील मुद्द्यांवर खल झाल्याचे समोर आले आहे.
जरांगे यांच्या भूमिकेला थेट उत्तरे देण्याऐवजी भाजपमधील किंवा इतर प्रभावी मराठा नेत्यांना पुढे आणून त्यांच्यामार्फत विरोध करण्याचे नियोजन यामध्ये सुचवण्यात आले आहे. यामध्ये खा. उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (नरेंद्र पाटील) यांच्यासारख्या नेत्यांचा वापर करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
जरांगे यांच्या विरोधात बोलणाऱ्या किंवा उभे राहणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या मोर्चांचा वा गाड्यांचा सर्व खर्च पक्षाच्या किंवा वैयक्तिक निधीतून उचलण्याची तयारी दर्शवण्यात आल्याचा दावा क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
“आपण सुचिता आणि पावित्र्य पाळण्याच्या नादात आपले राजकीय नुकसान होत आहे,” असा पवित्रा घेत जरांगेंच्या विरोधात ठिकठिकाणी मराठा नेत्यांचे गट सक्रिय करण्यावर भर देण्यात आल्याचे या क्लिपमध्ये ऐकायला मिळते.
५०० कोटींच्या वादाशी व राजकीय वर्तुळाशी संबंध
या संपूर्ण प्रकरणाला आणखी एक राजकीय किनार लाभली आहे. काही काळापूर्वी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये पोहोचल्याची कुजबूज भाजपच्या वर्तुळात सुरू असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडी आणि व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमुळे सत्ताधाऱ्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऑडिओ क्लिपमधील संभाषणातील महत्त्वाचे अंश
व्हायरल झालेल्या आणि जरांगे यांनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपमधील काही महत्त्वाचे संभाषण खालीलप्रमाणे आहे:
“जरांगे पाटील को ऑलरेडी ५०० करोड रुपये पोहोच चुके है… श्रीकांत शिंदे के पाससे पोहोच चुके है…”
“जरांगे पाटील विधानसभा चुनाव मे हमारे फायदे का रहेगा या…नहीं रहेगा..इससे मेरा मत अलग है, कॅल्क्युलेशन अलग है.. आप जो सोचते है, जो तथ्य है वो तो है ही…”
“निरंजन डावखरे जब आए थे, तब जरांगें के विरोधमें २ से ४ मराठा लोगों से उनका बोलना करा दिया है। दरेकरांशी एक ग्रुप सोडून दिला आहे. आपण सुचिता आणि पावित्र्य पाळण्याच्या नादात आपले राजकीय नुकसान होत आहे.”
“जरांगे शेती, कर्जमाफी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत नॅरेटिव्ह तयार करत आहेत आणि आपण फक्त त्याला उत्तरे देत बसतो. त्यामुळे त्यांना थेट तोंड देण्यापेक्षा त्यांच्याविरोधात वातावरण निर्मिती झाली पाहिजे.”
एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका
मनोज जरांगे यांनी केलेल्या या सर्व गंभीर आरोपांना आणि ५०० कोटींच्या दाव्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर देत फेटाळून लावले आहे. “मी कोणालाही ५०० कोटी रुपये दिले नाहीत आणि घेतलेही नाहीत, त्यामुळे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी जरांगे यांनी कुठलाही आरोप करण्यापूर्वी त्याची योग्य शहानिशा करायला हवी होती, अशी भूमिका घेतली. तसेच, जरांगे यांच्याकडे जर यासंदर्भात काही ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते संबंधित तपास यंत्रणांकडे द्यावेत जेणेकरून सत्य बाहेर येईल आणि “दूध का दूध, पाणी का पाणी” होईल, असे आव्हानही शिंदेंनी दिले आहे.


