Pune News : हायटेक जमान्यात सुद्धा मंगळागौरीची हौस कायम
हायटेक जमान्यात सुद्धा मंगळागौरीची हौस कायम
2 min read

मंगळागौरीला आता एका सुंदर 'कौटुंबिक स्नेहमेळाव्या'चे स्वरूप
स्मिता कुलकर्णी

Pune news पुणे( मिरर प्रतिनिधी) : सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही श्रावणातील मंगळागौरीचे आकर्षण कायम आहे. बदलत्या काळासोबत मंगळागौरीचे स्वरूपही आधुनिक झाले आहे. तथापि पारंपारिक आणि आधुनिकेतेचा सुरेख संगम नववधूंकडून साधला जात आहे. मंगळागौर पूजनाची व पारंपारिक खेळांची टिकवून ठेवण्याची नववधूंची हौस कायम आहे. फ्लॅट संस्कृतीमुळे हॉल किंवा मंदिरांमध्ये मंगळागौर साजरी केली जाते. त्यामुळे आता मंगळागौरीच्या निमित्ताने नातेवाईकांचा 'कौटुंबिक स्नेहमेळावा होत असल्याचे दिसत आहेत.
नववधूला लग्नानंतरची पहिली पाच वर्षे श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करणे त्यांना शक्य होत नाही. तरीही पहिल्या वर्षी सोयीनुसार श्रावणातील एका मंगळवारी घरची एक मंगळागौर अवश्य केली जाते. https://maharashtramirror.com/
व्रत का करावे ?
मंगळागौर हे नवविवाहितेने अखंड सौभाग्य आणि सासर-माहेराच्या सुखसमृद्धीसाठी करायचे एक व्रत आहे. भगवान शंकराची पत्नी गौरी हिच्या पूजेचे हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केले जाते. या व्रतामध्ये दर मंगळवारी मंगळागौरीची विधिवत पूजा करून, पाचव्या वर्षी आईला वाण देऊन उद्यापन केले जाते. मंगळागौरीचे खेळ हे महाराष्ट्राचे एक मोठे सांस्कृतिक संचित आहे. या खेळांमध्ये लहान मुलींपासून ते आजींपर्यंत सर्व वयोगटांतील स्त्रिया उत्साहाने सहभागी होतात. बदलत्या काळानुसार या खेळांचे आणि गाण्यांचे पारंपरिक रूप टिकून राहिले आहे. मंगळागौरीचे खेळ म्हणजे केवळ मौजमजा नसून ते शारीरिक, मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक समतोल साधणारे एक सहज-सुलभ माध्यम आहे. मंगळागौरीला साधी, कंबर, दंड, चौफुला,बस किंवा लोळण अशा अनेक प्रकारच्या दमछाक करणाऱ्या फुगड्या खेळल्या जातात. त्याचबरोबर झिम्मा, नाच गं घुमा, तिखट मीठ मसाला, कोंबडय़ाचे तीन-चार प्रकार, आळुंकी-साळुंकी, आटुंश पान, ताक, धोबीघाट आणि सासू-सुनेचे भांडण यांसारखे अनेक मजेदार व मिश्कील खेळ रंगत जातात.मंगळागौरीचे खेळ पहाटे पर्यंत सुरू राहतात. सकाळी मंगळागौरीला दहीभाताचा नैवेद्य दाखविला की या धार्मिक व्रतातील पूजाविधीची सांगता होते. Pune news https://maharashtramirror.com/
"यंदा मी प्रथमच मंगळागौर पूजणार आहे. पूजेसाठी रेडिमेड नऊवारीची साडी घेतली आहे. पूजेसाठीची तयारी झाली असून पूजेसाठी आम्ही उत्सुक आहोत. वडिलांचा व्यवसाय व आईची कामाची वेळेची ओढाताण सांभाळत, यंदा व्यावसायिक मंडळाच्या साथीने आम्ही मंगळागौर पूजन करणार आहोत. पूजा, खेळ यासाठी हॉल घेतला आहे. या कायर्क्रमासाठी नातेवाईक येणार आहेत. सवर्जण मिळून खूप धम्माल करणार आहोत. : मृणाल तुळसकर,(नववधू) पुणे maharashtra mirror
आमचा एकवीस जणींचा ग्रुप आहे."पूर्वी रात्रभर जागवली जाणारी मंगळागौर आता वेळेअभावी मर्यादित झाली असली, तरी आमचे मंडळ गाण्यांसह पारंपरिक खेळ सादर करून ही संस्कृती टिकवत आहे. खेळांसोबत त्यातील गाणी म्हणणे आणि विविध आवाज काढणे अशा प्रकारचे सादरीकरण करतो. यासाठी आधीपासून सराव करावा लागतो; यातून संस्कृतीचे दर्शन घडण्यासोबतच जनजागृतीही होते." : आरती भोसले (ग्रुप फाउंडर) 'श्री संस्कृती मंगळागौर ग्रुप' pune news


