Skip to content

Madhya pradesh news : गणेश विसर्जनानंतर दुर्घटना; विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू

Madhya pradesh news :मंडला, वृत्तसंस्था : गणेश विसर्जनानंतर मंडपात विश्रांती घेत असलेल्या भाविकांवर विद्युत प्रवाह असलेली वायर पडल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यात घडली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

गणेश विसर्जनानंतर दुर्घटना; विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू
गणेश विसर्जनानंतर दुर्घटना; विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू

Madhya pradesh news : मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील हिरापूर गावातील घटना; मंडपात झोपलेल्या भाविकांवर अम्प्लिफायरची वायर पडल्याची प्राथमिक माहिती

Madhya pradesh news :मंडला, वृत्तसंस्था : गणेश विसर्जनानंतर मंडपात विश्रांती घेत असलेल्या भाविकांवर विद्युत प्रवाह असलेली वायर पडल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यात घडली. नैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरापूर गावात पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेत आणखी तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी गणपती विसर्जनानंतर भाविक गावात परतले होते. त्यापैकी काही जण गणेश मंडपातील मंचावर झोपले होते. पहाटे अचानक विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने मंडपात विद्युत प्रवाह पसरला. झोपेत असलेल्या भाविकांना विजेचा जोरदार धक्का बसला. https://maharashtramirror.com/ Madhya pradesh news

या दुर्घटनेत बिरेंद्र भांगर (वय ५५), कृष्णकुमार भांबरे (वय १९), रवी (वय २४) आणि जैनू भांबरे (वय ३९) यांचा मृत्यू झाला. अन्य तीन जण जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मंडला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. नैनपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी मानसराम वागेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित भाविक गणेश मंडपात झोपलेले असताना शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर अॅम्प्लिफायरला जोडलेली विद्युत वायर तुटून झोपलेल्या व्यक्तींवर पडली. विजेचा तीव्र धक्का बसल्याने चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. गणेश विसर्जनानंतर काही तासांतच घडलेल्या या दुर्घटनेमुळे हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे. घटनेच्या नेमक्या कारणांचा पोलीस तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share