Skip to content

Malad Police News : एमटीएनएलची केबल चोरणारी टोळी मालाड पोलिसांच्या जाळ्यात; दोन आरोपींना रंगेहाथ पकडले

Malad MTNL Wire Latest Robbery News : 1 लाख 80 हजारांची तांब्याची तार आणि 5 लाखांचा मुद्देमाल जप्त; लिबर्टी गार्डन परिसरात पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केला पाठलाग

V
Vivek

2 min read

Malad Police News : एमटीएनएलची केबल चोरणारी टोळी मालाड पोलिसांच्या जाळ्यात; दोन आरोपींना रंगेहाथ पकडले

Malad MTNL Wire Latest Robbery News : 1 लाख 80 हजारांची तांब्याची तार आणि 5 लाखांचा मुद्देमाल जप्त; लिबर्टी गार्डन परिसरात पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केला पाठलाग

मुंबई :- मालाडमधील लिबर्टी गार्डन परिसरात एमटीएनएलच्या (MTNL) भूमिगत केबलची चोरी करणाऱ्या टोळीवर मालाड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेमकी घटना आणि पोलिसांची तत्परता

16 मार्च 2026 रोजी सायंकाळीच्या सुमारास मालाड येथील आशीर्वाद बिल्डिंग, रोड नं. 2 परिसरात काही इसम एमटीएनएलची केबल चोरत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच मालाड-01 मोबाईल व्हॅनवरील सफौ सूर्यवंशी, पोह सूरज कदम, भुसांडे आणि मपोशि कुटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची गाडी पाहताच चोरट्यांची पळापळ सुरू झाली, मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांना जागीच पकडले.

अटक केलेले आरोपी आणि जप्त मुद्देमाल

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत.

1) शनाउल्ला कुन्नू खान (35 वय)
2) मजीबुल्ला खान (21 वय)

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

कॉपर केबल: 10 मीटर लांबीची केबल (किंमत अंदाजे 60 हजार रुपये).

तांब्याची तार: 4 गोणींमध्ये भरलेली 100 किलो वजनाची तार (किंमत 1.20 लाख रुपये).

वाहन: चोरीसाठी वापरलेला टेम्पो.
एकूण मुद्देमाल: सुमारे 5.30 लाख रुपये.

पोलीस कोठडी आणि गुन्हा दाखल
या प्रकरणी एमटीएनएलचे मॅनेजर पुष्पराज पारिख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303 (2) आणि 3 (5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 19 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने शहरात इतरत्रही अशा चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

तपास पथक

ही यशस्वी कामगिरी उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उप आयुक्त संदीप जाधव, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विष्णू गिरी व त्यांच्या पथकाने पार पाडली.

Share