Pune News : महरेराचे आदेश: विनीत कृष्णकुमार गोयल अडचणीत; बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ
Pune News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी: पिंपरी येथील ‘बीझोन’ व्यावसायिक प्रकल्पासंदर्भात बीझोन कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्था मर्यादित यांनी मेसर्स यलो स्टोन प्रॉपर्टीजचे मालक विनीत कृष्णकुमार गोयल यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) अंशत
1 min read

Pune News : ‘बीझोन’ सोसायटीच्या तक्रारीवर निर्णय; प्रवर्तकाला कागदपत्रे देण्याचे निर्देश
Pune News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी: पिंपरी येथील ‘बीझोन’ व्यावसायिक प्रकल्पासंदर्भात बीझोन कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्था मर्यादित यांनी मेसर्स यलो स्टोन प्रॉपर्टीजचे मालक विनीत कृष्णकुमार गोयल यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) अंशतः मंजूर केली आहे. महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी हा आदेश दिला. हे प्रकरण तक्रार क्रमांक सीसी१२५०४६०५ आणि महारेरा प्रकल्प नोंदणी क्रमांक पी५२१००००२३४० शी संबंधित आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
महारेराच्या आदेशानुसार, संबंधित प्रकल्पाच्या तळमजल्यापासून आठव्या मजल्यापर्यंत अंशतः भोगवटा प्रमाणपत्रे (Part Occupancy Certificates) मिळाली आहेत. मात्र, नवव्या मजल्याला आणि त्यावरील टेरेसला अद्याप भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे रेरा कायद्याच्या कलम १७(२) अंतर्गत आवश्यक कागदपत्रे आणि आराखडे सोसायटीकडे सुपूर्द करण्याची प्रवर्तकाची जबाबदारी संपूर्ण प्रकल्पाचे भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लागू होईल, असे महारेराने स्पष्ट केले.


