Skip to content

Pune News : महाराष्ट्रातील विविध विभागांत पावसाचा अंदाज, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता

Pune News :पुणे ः भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे शनिवारी, (दि.१७)जाहीर करण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत आगामी काही दिवस पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

महाराष्ट्रातील विविध विभागांत पावसाचा अंदाज, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता

कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्र परिसर कोकण-गोवा: १७ ते २३ ऑक्टोबर दरम्यान कोकण-गोवा भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच १७ ऑक्टोबर रोजी या भागात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र: या भागात १७ ते २३ ऑक्टोबर दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
मराठवाडा आणि विदर्भ स्थिती मराठवाडा: १७ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ: १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी विदर्भातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर १९ आणि २० ऑक्टोबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान विदर्भातील हवामान पुन्हा कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानाचा हा अंदाज लक्षात घेऊन नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share