Skip to content

Maharashtra Session : उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हेंसह विधान परिषदेचे 9 सदस्य निवृत्त

Maharashtra Session Latest News : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा आठवडा

V
Vivek

1 min read

Maharashtra Session : उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हेंसह विधान परिषदेचे 9 सदस्य निवृत्त

Maharashtra Session Latest News : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा आठवडा

मुंबई :- महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा आठवडा आज, सोमवार 23 मार्च 2026 पासून सुरू होत आहे. हे अधिवेशन केवळ निरोप देणारेच नव्हे, तर विधान परिषदेतील अनेक दिग्गज नेत्यांच्या संसदीय प्रवासातील एका टप्प्याचा शेवट करणारे ठरणार आहे. येत्या 13 मे 2026 रोजी विधान परिषदेतील सदस्यांचा कार्यकाळ संपत असून, पावसाळी अधिवेशन जून-जुलैमध्ये होणार असल्याने हे या सदस्यांचे अखेरचे अधिवेशन आहे. Maharashtra Session Latest News

निवृत्त होणाऱ्या या 9 सदस्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक मोठी नावे आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. या नेत्यांच्या निवृत्तीमुळे वरिष्ठ सभागृहातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

या नऊ सदस्यांपैकी सर्वाधिक सदस्य भारतीय जनता पक्षाचे आहेत. निवृत्त होणाऱ्या सदस्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

भाजप: रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे.

शिवसेना (ठाकरे): उद्धव ठाकरे.

शिवसेना (शिंदे गट): नीलम गोऱ्हे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शप): शशिकांत शिंदे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): अमोल मिटकरी.

काँग्रेस: राजेश राठोड.

अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा

केवळ तीन दिवसांचा असल्याने, या निवृत्त होणाऱ्या सदस्यांना आज किंवा उद्या सभागृहात अधिकृतपणे निरोप दिला जाण्याची शक्यता आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी एप्रिल 2026 मध्ये निवडणुका होण्याची दाट शक्यता असून, विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीला आपल्या दोन पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान, या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या प्रकरणावर चर्चेची मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने केली जात आहे. मागील चार आठवड्यांपासून ही चर्चा टाळण्यात आली असली, तरी शेवटच्या तीन दिवसांत सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Share